'या' रेड लाईट एरियात फोटो घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 05:06 PM2018-12-03T17:06:03+5:302018-12-03T17:12:32+5:30

अॅमस्टरडॅम हे शहर नेदरलँडची राजधानी आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वर्दळ असल्याने येथे जाणे टाळायला हरकत नाही.

येथील कॉफीशॉपमध्ये चुकूनही जाऊ नका किंवा जाण्यापूर्वी विचार करा. कारण, येथे स्मोकिंग हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता.

अॅमस्टरडॅम येथे कोकीन किंवा कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज, अफीम विकत घेणे टाळावे. कारण, डग्ज विकत घेताना आढळल्यास तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल.

शक्यतो फुटपाथवरुन सायकल रायडिंग टाळाच. कारण, गर्दीच्या वेळांमुळे येथे पर्यटकांना तुमचा अन् तुम्हाला पर्यटकांचा त्रास होतो.

रेड लाईट एरियात गेल्यास महिलांचे फोटो घेऊ नका, अन्यथा तुम्हाला चांगलेच महागात पडेल. विशेष म्हणजे येथील रेड लाईट एरिया प्रसिद्ध ठिकाण आहे.

टॅग्स :पर्यटनtourism