'या' 10 देशांत भारतीय रुपयाची चलती; बिनधास्त करा हवी तेवढी भटकंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 05:05 PM2018-01-23T17:05:20+5:302018-01-23T17:20:12+5:30

इंडोनेशियात भारतीय चलनाची किंमत 207.78 इंडोनेशियन रुपये इतकी आहे. येथे भारतीय चलनाची किंमत जास्त आहे. भारताला येथे मोफत व्हिसा दिला जातो. कमी पैशांत जास्तीत जास्त मौज करण्यासाठी इंडोनेशिया उत्तम पर्याय आहे

व्हिएतनाममध्ये भारताच्या एका रुपयाची किंमत 355.04 वियतनामी डोंग इतकी आहे. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर व्हिएतनाम एक उत्तम पर्याय आहे. येथील संग्रहालय आणि वास्तुकला पाहण्यासारखे आहेत.

कंबोडियात भारतीय चलनाची किंमत 63.23 कंबोडियन रियाल इतकी आहे. अंगकोर वाट मंदिरासाठी कंबोडिया प्रसिध्द आहे. विशाल दगडांचा वापर करुन हे मंदिर बांधण्यात आलं आहे. येथे अत्यंत कमी खर्चात तुम्ही फिरु शकतात.

श्रीलंकेत भारतातील एक रुपया म्हणजे 2.38 श्रीलंकन रुपया आहे. भारतापासून अत्यंत जवळ असणा-या श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखं आहे. येथील समुद्र किनारे, डोंगरद-या, हिरवळ आणि ऐतिहासिक स्मारके मुख्य आकर्षण आहे.

नेपाळमध्ये भारतीय एक रुपयाची किंमत 1.60 नेपाळी रुपया इतकी आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज लागत नाही.

हंगरीत भारतीय एक रुपया म्हणजे 3.99 हंगेरीयाई फ़ॉरिंट आहे. हंगरीची वास्तुकला आणि संस्कृती अतिक्षय लोकप्रिय आहे. हंगरीची राजधानी बुद्धापेस्ट जगातील सर्वात रोमांटिक शहरापैकी एक आहे. परदेशवारी करायची असेल तर येथे नक्की जा. येथे जाण्यासाठी खिसा जड असण्याची गरज नाही.

जापानमध्ये भारतीय एक रुपया म्हणजे 1.70 जपानी येन आहे. शिस्त आणि मेहनतीसोबत आपल्या संस्कृतीसाठी जापान प्रसिद्द आहे. तेथील प्रगत तंत्रज्ञानाचे अविष्कार पाहण्याजोगे आहेत.

चिली येथे भारतीय एक रुपयाची किंमत 9.64 चिली पेसो आहे. जंगल आणि ट्रेकचा आनंद घेण्यासाठी चिली अत्यंत सुंदर ठिकाण आहे. चिलीमध्ये शेती, नदी, डोंगरद-या अत्यंत आकर्षक आहेत.

कोस्टा-रिका येथे भारतीय रुपयाची किंमत 9.03 कोस्टा रिकन कोलोन इतकी आहे. हा देश मध्य अमेरिका स्थित आहे. ज्वालामुखी, जंगले आणि वन्यजीव हे येथील प्रमुख आकर्षण आहे.

पेराग्वे येथे भारतीय एक रुपया म्हणजे 88.48 पैरागुएआन गुआरानी इतकी आहे. पेराग्वे दक्षिण अमेरिकामध्ये स्थित आहे. पेराग्वेमध्ये नैसर्गिक आणि भौतिकवाद यांचे मिश्रण पाहण्यास मिळते.

टॅग्स :पर्यटनtourism