जगभरातली अब्जाधीश लोक 'या' ठिकाणी येऊन उधळतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 01:32 PM2019-03-16T13:32:11+5:302019-03-16T13:36:30+5:30

श्रीमंत लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बऱ्याचदा आयलंडची निवड करतात. एखाद्या डिझर्ट आयलंडवर आलिशान हॉटेलमध्ये प्रसिद्ध अभिनेते, उद्योगपती धमाल करतात.

नेकर द्वीपही हॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे. बराक ओबामा, प्रिन्स हॅरी, केट मॉस, मारिया केरी यांसारख्या नावाजलेल्या व्यक्ती या द्वीपाला आवर्जून भेट देतात.

फ्रान्समधील कोटे डी'ज़ूर हे ठिकाणही फार प्रसिद्ध आहे. दक्षिणपूर्व फ्रान्सच्या भूमध्य सागरी भागात हे ठिकाण असून, इथे आलिशान रेस्टॉरंट, हॉटेल आहेत.

फ्रान्समधील कोटे डी'ज़ूर या ठिकाणाला फ्रेंच रिवेराही संबोधलं जातं. फ्रेंच रिवेरामध्ये अनेक मोठमोठाले बंगले आहेत. उन्हाळ्यातील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे ठिकाण बेस्टच आहे.

तसेच फ्रेंच पोलिनेशियामधील बोरा बोरा हे ठिकाणही सुट्टीची मज्जा लुटण्यासाठी भारी आहे. इथे जगभरातले श्रीमंत लोक येत असतात.

जेनिफर एनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्स यांनी काही दिवसांपूर्वीच बोरा बोराची हनिमूनसाठी निवड केली होती.

मालदीवमध्ये अथांग पसरलेले समुद्रकिनारे आणि तिकडची शांतता नेहमीच पर्यटकांना आकर्षून घेते. मालदीवमध्ये अनेक नयनरम्य द्वीपसमूह आहेत. मालदीवमधलं सोनेवा फुशी हे रिसॉर्टही एका खासगी आयलंडवर आहे.

इथे राहण्यासाठी पूर्ण व्हिला बुक करावा लागतो. या व्हिलामध्ये अनेक उच्चप्रतीच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. या व्हिल्यामधून आपण समुद्राच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो.