एप्रिलच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी 'या' आहेत बेस्ट जागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 01:40 PM2018-03-28T13:40:07+5:302018-03-28T13:40:07+5:30

ऑली- उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रात प्रसिद्ध बद्रीनाथ धामपासून जवळ दाट जंगल, डोंगराळ भागातील ही सुंदर जागा आहे.

ऑलीमध्ये जोशी मठ, छत्रा कुंड, क्वारी बुग्याल, सेलधार तपोन, गुरसौ बुग्याल, चिनाब धबधबा, वंशीनारायण कल्पेश्वर अशा अनेक पाहण्यासारख्या जागा आहेत.

पंचमढी- होशंगाबद जिल्ह्यातील पंचमढी मध्य भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. तेथे असणारी हिरवळ, शांत वातावरण आणि अनेक नद्या पर्यटकांचं आकर्ष आहेत.

रजत प्रपात, बी फॉल्स, पांडवांची गुफा, शिवशंकराचं प्रसिद्ध मंदिर जटाशंकर महादेव आणि गुप्त महादेव अशी फिरण्यासारखी ठिकाणं आहेत.

कन्याकुमारी- तामिळनाडूतील दक्षिण तटावर बसलेलं शहर कन्याकुमारी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. हिंदी महासागर, बंगालची खाजी आणि अरबी समुद्राचं हे संगम स्थळ आहे.

विवेकानंद रॉक मेमोरियल, कन्याकुमारी अम्मन, कन्याकुमारी बीच, पद्मानभापुरम महल, नागराज मंदिर अशी तिथली प्रसिद्ध फिरण्यासारखी ठिकाणं आहेत.

टॅग्स :प्रवासTravel