जगातील या 4 अद्भुत वास्तू माहिती आहेत?, आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:41 PM2018-09-05T16:41:21+5:302018-09-05T16:43:44+5:30

1. पीसा येथील लीनिंग टॉवर : पीसा येथील लीनिंग टॉवर ही वास्तू कधी काळी विश्वातील सात आश्चर्यापैकी एक मानली जायची. हा टॉवर एका बाजूनं झुकलेला आहे, ही या वास्तूची आश्चर्यजनक गोष्ट आहे. हा टॉवर कोणत्याही क्षणी कोसळले की काय ?, असे टॉवरकडे पाहिल्यावर वाटते. या उंच टॉवरवरुन आसपासचा सुंदर नजारा पाहावा, यासाठी पर्यटक या वास्तूला भेट देतात.

2. पाण्यावर तरंगणारे व्हेनिस : एड्रियॅटिक समुद्राच्या वायव्य टोकाशी असलेल्या, खाऱ्‍या पाण्याच्या एका सरोवराच्या मधोमध वसलेले व्हेनिस शहर 118 द्वीपांना एकमेकांशी जोडते. या द्वीपांना लाकडी पुलांच्या सहाय्यानं एकमेकांसोबत जोडण्यात आले आहे. जवळच्याच समुद्रात येऊन मिळणाऱ्‍या नद्यांतून किनाऱ्‍यावरच्या उथळ पाण्यात बराच गाळ येऊन साचतो. व्हेनिस शहराची स्थापना सा.यु. पाचव्या ते सातव्या शतकांमध्ये झाली असावी, असे अभ्यासकांचं मत आहे.

3. चीनची भिंत : 'द ग्रेट वॉल' म्हणून ओळखली जाणारी चीनची भिंत पाहण्याची सर्वांचीच इच्छा असते. या भिंतीचे बांधकाम पूर्णकाम करण्यास जवळपास 2000 वर्ष पूर्ण लागल्याचे म्हटले जाते. मात्र आजही भिंतीबाबतचे रहस्य कायम आहे.

4. गोल्डन गेट ब्रिज गोल्डन गेट ब्रिज (Golden Gate Bridge) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामधील एक प्रसिद्ध पूल आहे. 1937 साली बांधण्यात आलेला हा पूल सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाला उत्तर भागाशी जोडतो. जगातील सर्वात सुंदर व सर्वाधिक फोटो काढला जाणारा पूल असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.