ही आहेत Rock Climbing करण्यासाठी बेस्ट १२ ठिकाणे, थरारक अनुभवासाठी व्हा सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:31 PM2019-04-23T16:31:38+5:302019-04-23T17:01:28+5:30

१) पार्वती घाट - हिमाचल प्रदेशचा पार्वती घाट हा पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. येथील उंचच डोंगरात Rock Climbing चा तुम्ही आनंद घेऊ शकता. (Image Credit : www.himachalonline.com)

२) शे रॉक - लेहजवळ असलेल्या शे रॉक क्षेत्रात Rock Climbing साठी सर्वात चांगलं ठिकाण मानलं जातं. इथे दिल्या जाणाऱ्या सुविधा देखील फार चांगल्या आहेत. त्यासोबतच Rock Climbing साठी The Hiram Crack हे ठिकाणही चांगलं मानलं जातं. (Image Credit : travelkabaap.com)

३) म्यार व्हॅली - पंजाबमधील म्यार व्हॅली सुद्धा यासाठी लोकप्रिय आहे. चारही बाजूंनी हिरवीगार झाडे आणि उंचच उंच डोंगरांनी सजलेला म्यार घाट Rock Climbing साठी प्रसिद्ध ठिकाण आहे. (Image Credit : indiahikes.com)

४) सर पास - सर पास Rock Climbing आणि ट्रेकिंगसाठी चांगलंच लोकप्रिय आहे. इथे तुम्ही निसर्गाच्या कुशीत Rock Climbing चा आनंद घेऊ शकता. (Image Credit : storyv.com)

५) दमदमा लेक - हरयाणातील दमदमा लेक आपल्या सुंदरतेसाठी पर्यटकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. इथे जास्तीत जा्सत पर्यटक बोटिंगसाठी येतात. पण गेल्या काही वर्षांपासून इथे Rock Climbing साठी पर्यटक येतात. तसेच इथे तुम्ही ब्रिज क्रॉसिंग सारख्या इतरही काही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता. (Image Credit : www.thrillophilia.com)

६) मालशेज घाट - पावसाळ्यात माळशेज घाटाचं सौंदर्य दुथडी भरुन वाहत असतं. या घाटातही Rock Climbing करता येतं. (Image Credit : newsmobile.in)

७) रामनगर - रामनगर Rock Climbing आणि Adventure Sports साठी प्रसिद्ध आहे. हे बंगळुरुपासून जवळपास ५० किलोमीटर दूर आहे. इथे वीकेंडला चांगलीच गर्दी असते. सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे भेट द्यावी. (Image Credit : cltpstatic.com)

८) मधुगिरी - मधुगिरीमध्ये Rock Climbing चा आनंद वेगळाच असेल. कारण Rock Climbing ला इथे अधिक रोमांचक करण्यासाठी डोंगरांमध्ये वेगवेगळे रस्ते तयार करण्यात आले आहेत. (Image Credit : blogspot.com)

९) हम्पी - कर्नाटक हम्पी हे ठिकाण पर्यटकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. लोक इथे मंदिरे आणि भारतीय संस्कृती बघण्यासाठी येतात. सोबतच काही पर्यटक अॅडव्हेंचरसाठीही येतात. यातील जास्त लोक Rock Climbing करतात. (Image Credit : www.holidify.co)

१०) Savandurga Hills - Savandurga Hills आशियातील सर्वात मोठ्या Monolithic Rock Formation पैकी एक आहे. इथे एकदा नक्की Rock Climbing च अनुभव घ्यायला हवा. इथे तुम्ही रॅपलिंग आणि ट्रेकिंगचा देखील अनुभव घेऊ शकता. (Image Credit : thrillophilia.com)

११) Pythal Mala Rock - Pythal Mala Rock कपिमाला गावाच्या बाहेरील परिसरात आहे. Rock Climbing साठी हे एक चांगलं डेस्टिनेशन आहे. इथे तुम्हाला अनेक प्रकारच्या खडकांची माहितीही मिळेल. (Image Credit : travelkabaap.com)

१२) लाडो सराय - लाडो सराय ओल्ड रॉक्स दिल्लीच्या कुतुब कॉम्प्लेक्सजवळ आहे. हे भारतातील लोकप्रिय Rock Climbing स्थानांपैकी एक आहे. (Image Credit : passionstreet.in)