मीरा-भाईंदरमध्ये सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 08:17 PM2018-01-07T20:17:08+5:302018-01-07T20:20:24+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे.

मात्र वर्गीकरण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे.

प्रशासनानं सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प जानेवारीच्या अखेरीस सुरू करण्याचा ठरविले आहे.

तर ओला कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल महिना उजाडणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी खास लोकमतला दिली.

पालिका हद्दीत दिवसाकाठी सुमारे ४०० ते ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा उत्तन येथील धावगी-डोंगर घनकचरा प्रकल्पात टाकला जातो.