ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात 'होलिकोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:38 PM2018-02-28T22:38:50+5:302018-02-28T22:38:50+5:30

ठाणे : चेंदणी कोळीवाडा येथील चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्यावतीने होळी साजरी करण्यात आली.

कोळीवाड्यातील समाज बांधवांमध्ये एकोपा रहावा आणि नव्या पिढीमध्ये परंपरा रूजाव्यात यासाठी होळीच्या पूर्वसंध्येला पारंपारिक पध्दतीने होळी पेटविण्यात आली.

यावेळी कोळीवाड्यातील कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत होळीचे पूजन करण्यासाठी उपस्थित होते.

ठाणे शहरातील ही होळी सर्वात जुनी होळी मानली जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी उत्साहात साजरी करण्यात आली. (सर्व फोटो - विशाल हळदे)