खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:28 PM2018-01-30T23:28:54+5:302018-01-30T23:34:38+5:30

भार्इंदरच्या मोर्वा गावा मागील बांध दुरुस्तीच्या दरम्यान खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी शासनाच्या खारभुमी विकास विभागाच्या अधिकारयांसह सबंधितांवर भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतजमीनींमध्ये शिरु नये म्हणुन सदरचा बांध व उघाड्या असल्या तरी सदर बांधा वरुन बेकायदा माती भराव करणारी वाहनं, खाजगी वाहनं बेकायदा नेली जातात. या बांधच्या लगत देखील बेकायदा भराव व बांधकामे झालेली आहेत.

शेतक-यांची शेती नष्ट होऊ नये म्हणुन बांध व उघाड्यांची नियमीत देखभाल व दुरुस्ती आवश्यक असताना इतकी वर्ष निधी नाही म्हणुन खारभुमी विभागा कडुन दुर्लक्ष केले जात होते.

इतकी वर्ष लक्ष न देणारया खारभुमी विभागा ने आता बांध दुरुस्तीची निवीदा काढुन ठेकेदारा मार्फत काम सुरु केले होते. परंतु कामा दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या झाडांची तोड करुन तसेच खारफुटी मध्ये माती भराव करण्यात आल्याच्या तक्रारी परिसरातील स्थानिकांनी केल्या होत्या.

त्या अनुषंगाने तहसिलदार अधिक पाटील, नायब तहसिलदार पंढरीनाथ भोईर, मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांच्या निर्देशा नुसार तलाठी गणेश भुताळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली

त्या ठिकाणी दोन पोकलेन, चार ट्रॅक्टर हे खारफुटी, पाणथळ क्षेत्रात माती भराव करताना आढळुन आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडं तोडुन त्याचे ढिग लावलेले होते.

उच्च न्यायालयाचे सततचे आदेश असताना देखील त्याचे सर्रास उल्लंघन केल्या प्रकरणी भुताळे यांच्या फिर्यादी नुसार घटनास्थळी असलेले ठेकेदाराचे कर्मचारी, पोकलेन - ट्रॅक्टरचे चालक मालक . ठेकेदार , सुपरवायझर तसेच खारभुमी विभागाचे मिठारे व वानखेडे या अधिकारयां विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.