तोडक कारवाईवेळी इक्विटी बारला तर घनकचरा प्रकल्पाला उष्णतेमुळे लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 09:10 PM2017-11-03T21:10:18+5:302017-11-03T21:14:25+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बार व लॉजवर दोन दिवसांपासुन तोडक कारवाई सुरु केली आहे. पथकाने कारवाईचा मोर्चा तेथीलच इक्विटी बारकडे वळविला

पालिकेच्या उत्तन घनकचरा प्रकल्पाला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला देण्यात आली

अग्निशमन दलाच्या दोन बंबगाड्या घनकचरा प्रकल्पाकडे रवाना केल्यानंतर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास इक्विटी बारच्या टेरेसवर धुर येऊ लागला

हि आग तेथील प्लास्टिकच्या पत्र्यांना लागल्याचे लक्षात येताच तीने उग्र रुप धारण करण्यापुर्वीच इतर बंबगाडयांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले

यात कोणतीही जिवितहानी झाली नसुन कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.

आग अर्ध्या तासातच आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले