डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:50 PM2017-12-13T23:50:52+5:302017-12-13T23:56:53+5:30

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट झाली आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत बुधवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध प्रवासी सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या (डीएफसीसी) वतीने प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या मनात भीतीचे वातावरण असून घराच्या बदल्यात घर देण्याच्या धोरणाला तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे.