भाभीजी घर पर है या मालिकेतील सौम्या टंडनने नुकतीच दिली गुड न्यूज, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:52 PM2018-11-15T15:52:18+5:302018-11-15T16:00:03+5:30

सौम्या टंडन प्रेग्नंट असून लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. सौम्याने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत, ही गुड न्यूज दिली आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये सौम्याने बँक अधिकारी सौरभ देवेन्द्र सिंहसोबत लग्न केले होते. येणारे बाळ या जोडप्याचे पहिले अपत्य असणार आहे.

सौम्या सध्या जाम आनंदात आहे. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

सौम्या तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते.

सौम्या तिच्या प्रेग्नन्ससीमध्ये तर खूपच छान दिसत आहे. तिला एक वेगळाच ग्लो आलेला आहे.