सर्वात पहिला 5G फोन कोण आणणार? कंपन्यांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:19 PM2018-10-24T12:19:19+5:302018-10-24T12:26:30+5:30

भारतात सध्या 2G, 3G च्या जमान्यानंतर 4G ने धुमाकूळ घातला आहे. 2G हे आता काँलिंग आणि ढिम्म डाटा स्पीडसाठी ओळखले जाते. तर 3G आल्यानंतर इंटरनेटच्या वेगामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसत होते. तितक्यातच रिलायन्स जिओने 4G आणून युवा पिढीला इंटरनेटच्या आहारी नेले. मात्र, सध्याचे 4G चे मंदावलेला वेग पाहता लवकरच दहा पट वेगवान असलेले 5G नेटवर्क भारतात लाँच करण्याच्या तयारीत काही कंपन्या आहेत. मात्र, अद्याप त्यासाठी मोबाईल फोन बाजारात आलेले नाहीत.

लवकरच 5G फोन हातात दिसणार आहेत आणि धक्का देणारी गोष्ट म्हणजे एक-दोन नाही बऱ्याच कंपन्या आपले 5G मोबाईल बाजारात उतरविण्याच्या तयारीला लागल्या आहेत. 2019 पर्यंत भारतासह जगभरात हे 5G फोन उपलब्ध होतील. क्वालकॉमने 23 ऑक्टोबरला 4G/5G समिटचे आयोजन केले होते. या दरम्यान ओप्पो, व्हीवो, वनप्लस आणि नोकियासह अन्य कंपन्यांनी 2019 पर्यंत 5G फोन बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे.

25 ऑक्टोबरला शाओमी एमआय मिक्स 3 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करत आहे. यामध्ये 5जी सपोर्ट असणार असल्याचे कंपनीने आधीच जाहीर केले आहे. भारतात हा फोन येण्याबाबत कंपनीने अद्याप काही माहिती दिलेली नाही.

सॅमसंग आपल्या नव्या गॅलॅक्सी एस10 मध्ये 5जी सपोर्ट देण्याची शक्यता आहे. सॅमसंगचा एस सिरिजमधला फोन क्लालकॉमच्या नव्या चिपसेटसह येतो. पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 असणार आहे जो 5जीची क्षमता ठेवतो.

कोरिअन फोन निर्माता कंपनी एलजीही या स्पर्धेत असून 2019 च्या सुरुवातीलाच 5जी फोन लाँच करणार आहे. क्वालकॉमनेही याबाबत दुजोरा दिला आहे. एलजी जी 8 थिंक मध्ये 5जी असण्यची शक्यात आहे.

क्वालकॉमच्या इव्हेंटमध्ये कंपनीने सांगितले आहे की, 2019 मध्ये लाँच केला जाणार फोन हा 5 जी चा असणार आहे. म्हणजेच वनप्लस 7 मध्ये 5 जी असण्याची शक्यता आहे.

चीनची प्रमुख मोबाईल निर्माता कंपनी व्हिवोने ही 2019 पर्यंत 5जी स्मार्टफोन लाँच करण्याचे मान्य केले आहे. व्ही 13 किंवा नेक्स सिरिजमध्ये 5 जी असेल. तसेच 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणावर 5जी स्मार्टफोनचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. म्हणजेच 2020 पर्यंत सामान्यांच्या खिशाला परवडणारे 5जी फोन उपलब्ध होतील.

व्हिवो, शाओमी आणि ओप्पो या एकमेकांसोबत स्पर्धा करणाऱ्या कंपन्या आहेत. यामुळे ओप्पोही या 5जीच्या स्पर्धेत मागे राहणार नाही. 2019 मध्ये 5 जी स्मार्टफोन येईल. तसेच मोठ्या प्रमाणावर उत्पादनही सुरु केले जाणार असल्याचे कंपनीच्या सहाय्यक उपाध्यक्ष शेन यीरेन यांनी सांगितले. एफ 11 आणि फाईंड या सिरिजमध्ये 5 जी येण्याची शक्यता आहे.