मार्क झुकरबर्ग करणार 'या' तीन लोकप्रिय कंपन्यांचे विलीनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:38 PM2019-01-29T15:38:01+5:302019-01-29T16:05:51+5:30

मार्क झुकरबर्ग तीन लोकप्रिय कंपन्यांचे विलीनीकरण करणार आहे. फेसबुकने WhatsApp, Instagram आणि Facebook Messenger या तीन मुख्य सेवा एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फिचर आणत असते. आता फेसबुकवरून Instagram आणि WhatsApp वरही मॅसेज पाठविता येणार आहेत.

WhatsApp वरून ही सुविधा फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत.

मॅसेज पाठिवण्याची ही प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षितच असणार आहे. ही प्रणाली आजही WhatsApp मध्ये वापरली जाते. ज्यामुळे WhatsApp वरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही.

फेसबुकने ही सुविधा कधी सुरू करणार हे अद्याप सांगितले नसले तरीही 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.

फेसबुकवर वेळ घालवणाऱ्या लोकांचे प्रमाण क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेंजिंग सुविधेमुळे वाढणार आहे.

गुगलच्या मॅसेंजिंग आणि अ‍ॅपलच्या आय मॅसेजला हे टक्कर देऊ शकणार आहे. त्याचबरोबर Facebook, Instagram आणि WhatsApp चे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे.