नोकरी शोधताय? मग हे अॅप ठरतील अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:08 PM2018-09-03T15:08:35+5:302018-09-03T15:17:02+5:30

आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. दरवर्षी हजारोच्या संख्येने विद्यार्थी हे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. मात्र प्रत्येकालाच मनासारखी नोकरी मिळतेच असं नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही अॅप सांगणार आहोत ज्यांची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

Nokri.com हे इंडियन जॉब पोर्टल आहे. मार्च 1997 मध्ये या पोर्टलची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत लाखो लोक नोकरीसाठी येथे संपर्क करत असतात. यामुळे अनेकांना फायदा झाला आहे.

LinkedIn हि एक व्यवसाय आणि रोजगारावर आधारित सर्व्हिस आहे. वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून तुम्ही त्याचा वापर करु शकता. प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी याचा फायदा होणार असून या सर्व्हिसमध्ये विविध कंपन्या जॉब पोस्ट करत असतात तर नोकरी शोधत असणारी मंडळी येथे त्यांचा बायोडेटा पोस्ट करतात.

Worknrby हे एक अॅप असून याच्या मदतीने तुम्ही हवी तशी नोकरी मिळवू शकता. Worknrby मध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील द्या. त्यामध्ये व्हेरिफिकेशननंतर तुमचे शिक्षण आणि इतर डेटा शेयर केला जातो तसेच नोकरी मिळण्यास मदत होते.

Monster.com ही अमेरिका बेस ग्लोबल एम्प्लॉयमेंट वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार घराजवळ असलेल्या ठिकाणी नोकरी मिळण्यास मदत होते.