OnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:01 PM2018-11-14T16:01:17+5:302018-11-14T16:04:36+5:30

वनप्लस 6T जगभरात लाँच होऊन आठवडा उलटत नाही तोच पुढील फोन OnePlus 7 चे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. OnePlus कंपनी दर सहा महिन्याला जुना फोन बंद करून नवीन फोन लाँच करत असल्याने आता वनप्लस 6T घेण्याचा विचार करणारे थांबण्याची चिन्हे आहेत.

OnePlus 7 चा कन्सेप्ट मोबाईलचे फोटो GizmoChina ने लीक केले आहेत. यामध्ये सध्याच्या फोनमधील ऑनस्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरशिवाय डिस्प्लेमध्येच कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच सध्याच्या ड्युअल रिअर कॅमेरा फोनमध्ये आणखी एक कॅमेरा वाढणार असून तीन कॅमेरे मिळणार आहेत. ओप्पोने नुकताच लाँच केलेल्या RX17 Pro सारखाच या फोनचा कॅमेरा सेटअप दिसत आहे.

OnePlus 7 च्या या भन्नाट फोनमध्ये तीन कॅमेरे असतील. यामध्ये 16 मेगा पिक्सलचा बदलणारा प्रायमरी सेन्सर (f/1.5 t व f/2.4) आणि f/2.6 अॅपेर्चरची दुसरी टेलिफोटो लेन्स यासर थ्रीडी इमेज कॅप्चर करण्यासाठी TOF (Time of Flight) सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.

सेल्फी कॅमेरा मात्र डिस्प्लेमध्येच ओ आकाराचा असणार आहे. यामुळे सध्याचे नॉच, ड्रॉपनॉच असलेले वनप्लसचे फोन गायब होणार आहेत. हा कॅमेरा 24 मेगापिक्सलचा असेल. तसेच स्क्रीनचा बॉडी रेशो आतापर्यंतचा सर्वात उच्च असणार आहे. मात्र, हा फोन 5G ला सपोर्ट करणारा नसेल. या फोनची बॅटरी 4150 एमएएच असेल. कंपनी 5G चे फोन लाँच करेल पण त्यांची किंमत जास्त असणार आहे.