ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:35 PM2017-09-18T16:35:12+5:302017-09-18T16:44:15+5:30

पेटीएम (Paytm) पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अनेक गोष्टी सहजपणे करु शकता. मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग करण्यापासून ते वीजबिल भरण्यापर्यंत अनेक गोष्टी पेटीएममधून करणं शक्य आहे. तुम्ही व्यवहार कराल त्याप्रमाणे येथे रिवॉर्ड पॉईंट्स मिळत जातात. एखाद्याला पैसे पाठवण्यासाठीही पेटीएमचा वापर करु शकतो. महत्वाचं म्हणजे दुकानात, पेट्रोल पंपावर बिल भरताना तुम्ही पेटीएमचा वापर करु शकता. यावेळी समोरच्या व्यक्तीकडेही पेटीएम अॅप असणं गरजेचं आहे. तुम्ही रिक्षा आणि टॅक्सीचं भाडंही पेटीएमच्या माध्यमातून भरु शकता.

ऑक्सिजन वॉलेट (Oxigen Wallet) व्यवहार करताना आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील यादृष्टीने हे अॅप डिझाईन करण्यात आलं आहे. मोबाइल/डीटीएच किंवा लँडलाइन, मोबाइलचं बिल भरण्यासाठी या अॅपचा वापर करु शकतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर एक फ्री कूपनही दिलं जातं. अॅपच्या माध्यमातून बँकेत किंवा मित्रांना पैसेही पाठवू शकतो. जवळपास 15 हजार वेबसाइट्सवर या अॅपच्या माध्यमातून शॉपिंग करत डिल आणि कॅशबॅक मिळवू शकता.

पेयूमनी (PayUmoney) या मोबाइल अॅपच्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज करण्यासोबत बिलदेखील भरु शकता. इतकंच नाही तर अॅपच्या माध्यमातून तुम्ही मित्रांना पैसे ट्रान्सफर करु शकता. यासोबत हे अॅप तुम्हाला बिल वेळेत भरण्याची आठवणही करुन देत असतं.

फ्रीचार्ज (Freecharge) कॅशलेस होण्याचा विचार करत असाल तर हे अॅपही चांगला पर्याय आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शनवेळी हे अॅप NOV100 कोडचा वापर करत 100 टक्के कॅशबॅक देतं. महत्वाचं म्हणजे डाटा पॅक संपला असेल तर हे अॅप 'डाटा लाईफलाईन' म्हणून काम करतं. हे फिचर फक्त प्रीपेड युजर्ससाठी असून फ्रीचार्ज टोकनच्या बदल्यात 3जीबी 100 एमबी डाटा दिला जातो. 'चॅट अॅण्ड पे' फिचरच्या माध्यमातून पैसे घेतले किंवा पाठवलेही जाऊ शकतात.

मोबीक्विक (MobiKwik) या अॅपच्या सहाय्याने फक्त ऑनलाइन रिचार्जच नाही तर बस आणि रेल्वे तिकीट बूकिंगही करता येऊ शकतं. तसंच प्रीपेड, पोस्टपेडसहित वीज आणि गँसचं बिलही भरु शकता. याशिवाय इन्शुरन्स, ब्रॉडब्रॅण्ड, लँडलाइन आणि डाटाकार्डचं पेमेंटही करता येत. तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करु शकता आणि बूक माय शो, बिग बाजार, डॉमिनोज, मिंत्रासारख्या ऑनलाइन स्टोअर्सवर कॅशबॅकही मिळवू शकता.

टॅग्स :मोबाइलMobile