क्वालिटी खराब न करता अशी कमी करा व्हिडीओची साइज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:12 PM2019-06-01T15:12:00+5:302019-06-01T15:19:05+5:30

व्हिडीओची साइज जास्त असल्याने अनेकदा व्हिडीओ जास्त जागा घेतात. मात्र क्वालिटी खराब न करता व्हिडीओची साइज कमी करता येते कसं ते जाणून घेऊया.

ब्राऊजरमध्ये गुगल.कॉम साईटवर जाऊन handbrake सर्च करा. त्यानंतर एक साईट ओपन होईल.

वेबसाईट ओपन केल्यावर काही तपशील दिसतील ते नीट वाचा त्यानंतर डाऊनलोडवर क्लिक करून डाऊनलोड करा.

सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करा.

इन्स्टॉल करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे.

इन्स्टॉल केल्यावर Open source वर क्लिक करून फाईल add करा. त्यानंतर हवा असलेला व्हिडीओ सॉफ्टवेअरमध्ये Drag करून Drop करा.

Software features dimensions वर क्लिक करा आणि video ची size width and height set करा जर youtube साठी video तयार करायचा असेल तरा त्याची size 1280×720 ठेवा.

Video option वर क्लिक करून Video quality कमी जास्त करा. मात्र ही साइज 21-25 दरम्यान ठेवा. जास्त ठेवल्यास video ची क्वालिटी खराब होऊ शकते. जेथे व्हिडीओ सेव्ह करायचा आहे ते लोकेशन ठरवा. Start encode button वर क्लिक केल्यानंतर video compress होण्यास सुरुवात होते.

features summary, dimensions, filiter, video, audio, subtitles, chapters चा वापर करून व्हिडीओची साइज कमी करता येते.