गुगलने सर्वोत्कृष्ट घोषित केलेले काही गेम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:01 PM2018-10-31T21:01:02+5:302018-10-31T21:06:01+5:30

स्मार्टफोन युजर्ससाठी प्ले- स्टोअरवर हजारो गेम्स उपलब्ध आहेत. यामधील काही गेम्सला गुगलने सर्वोत्कृष्ट घोषित केले आहे. कँडी क्रश फ्रेंड सागा हा गेम सर्वात प्रसिद्ध कँजी क्रश गेमचे अपडेटेड व्हर्जन आहे.

हॅलो कॅट्स- मांजर प्रेमींसाठी हा उत्तम गेम आहे.

फिक्स इट, गिअर पझल- या गेममध्ये गेअर्सना एकमेकांशी कनेक्ट करून खेळायचे असते.

क्रेझी कार स्टंट- या गेममध्ये फार कठीण रस्त्यांवर गाड्यांची रेसिंग लागते. यात रेसिंग ट्रॅकही असतो.

जंगल मंकी रन- अडव्हेंचर रनिंग गेममध्ये हा गेम सर्वोत्तम आहे.

लाइन पझल स्ट्रिंग आर्ट- या गेममध्ये लाइन्सला एका पॉइंटवर कनेक्ट करून शेप बनवायचा असतो.