OnePlus 7 अमेरिकेसोबत भारतातही लाँच होणार, दिवसही ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:12 AM2019-04-24T10:12:13+5:302019-04-24T10:30:21+5:30

जगभरात 5जीचे युग अवतरत असताना वनप्लस या प्रिमियम श्रेणीतील मोबाईल कंपनीने त्यांच्या यंदाचा नवा OnePlus 7 स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती दिली आहे.

OnePlus 7 चे फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होते. हा फोन भारतासह अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये एकाचवेळी लाँच केला जाणार आहे.

OnePlus 7 मध्ये 5जी सपोर्ट देणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 एसओसीसह लाँच केला जाणार आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच झाल्यावेळीच OnePlus 7 चे पेटे लाऊ यांनी हा प्रोसेसर नव्या मोबाईलमध्ये वापरणार असल्याचे म्हटले होते.

या सिरिजमध्ये OnePlus 7 आणि प्रो असे दोन व्हेरिअंट लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

हे स्मार्टफोन 30 W च्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने लाँच केला जाऊ शकतो. या फोनचा डिस्प्ले फुल QHD+ असू शकतो. तसेच 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेराही मिळण्याची शक्यता आहे.

लाँचिंग इव्हेंट कंपनीच्या सोशल मिडियावर पाहता येणार आहे. तसेच या इव्हेंटची तिकिटे 25 एप्रिलपासून खरेदी करता येणार आहेत.

भारतात हा फोन 14 मे रोजी लाँच केला जाणार आहे.