परदेशात फिरायला जाण्याचा बेत असेल तर 'हे' अॅप ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:57 PM2018-10-03T14:57:13+5:302018-10-03T15:25:39+5:30

परदेशात फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर असे काही अॅप आहेत ज्यांच्या मदतीने तिकीट, हवामान आणि परदेशात फिरायला जाताना निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत सोपं होतं. या अॅप विषयी जाणून घेऊया.

जगातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर 'ट्रॅव्हल अॅप' हे अत्यंत फायदेशीर अॅप आहे. या अॅपमध्ये पर्यटनासाठी जाणार असलेल्या ठिकाणाचे हवामान, तिकीट, आहाराची व्यवस्था यासह अन्य माहिती सहज उपलब्ध होते.

योग्य दरात जर तुम्हाला एखाद्या देशाची सफर करायची असेल तर 'स्काय स्कॅनर' हे अॅप उपयोगी ठरणार आहे. या अॅपच्या मदतीने वेगवेगळ्या साईटवरील तिकिटाच्या दराची तुलना करणं सोपं होतं.

वेगवेगळ्या देशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी 'एक्यू वेदर' हे अॅप अत्यंत महत्वाचं आहे. कोणत्याही ठिकाणी फिरायला जाण्याच्या आधी या अॅपच्या मदतीने तेथील हवामानाची माहिती मिळते.

'हॅपी काऊ' हे अॅप फ्री आणि पेड या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. अनेकदा परदेशात प्रवास करताना शाकाहारी माणसांना आहारासंबंधीत काही समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र या अॅपच्या मदतीने जगातील कोणत्याही देशातील शाकाहारी हॉटेल आणि तेथील मेन्यूची माहिती मिळते.

परदेशात फिरायला जाताना 'ऑल करन्सी कनव्हर्टर' अॅप अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण या अॅपच्या मदतीने तुम्हाला तेथील करन्सीची माहिती मिळेल. तसेच हिशोब ठेवणंही त्यामुळे सोपं होईल.