Gmail मध्ये वापरा कॅलेंडर, नोट्स आणि टास्क लिस्टसारखे अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:20 AM2019-05-29T11:20:04+5:302019-05-29T11:24:31+5:30

Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात.

गुगल आपल्या युजर्सना कॅलेंडर चेक करण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी G-Suite अ‍ॅपशिवाय तसेच मेल टॅब न सोडता मेलचा वापर करण्याची संधी दिली आहे. Gmail मध्ये वापरा कॅलेंडर, नोट्स आणि टास्क लिस्टसारखे अ‍ॅप वापरता येणार आहेत. यासाठी स्टेप्स जाणून घेऊया.

सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉपच्या ब्राऊजरवर जीमेल ओपन करा.

ओपन केल्यावर अ‍ॅप्सचं आयकॉन बटण दिसतं की नाही ते पाहा.

जर आयकॉन बटण दिसत नसेल तर खालच्या दिशेला उजव्या कोपऱ्यात 'Show side panel' चा अ‍ॅरो दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आयकॉन दिसतील.

कॅलेंडर, नोट्स, टास्क आणि इतर अ‍ॅपवर क्लिक करून या पेजवर युजर्स त्याचा अ‍ॅक्सेस घेऊ शकतात.

सर्वात शेवटी देण्यात आलेल्या '+' आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर इतरही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही जोडू शकता.

यावर क्लिक केल्यावर जी-स्वीट मार्केटप्लेस ओपन होईल. येथून ऑन्स डाऊनलोड केले जाऊ शकतात.

सध्या हे साईड पॅनल जीमेलच्या अँड्रॉईड किंवा आयओएस अ‍ॅप्सवर दिसणार नाही. यासाठी स्मार्टफोनमध्ये मल्टी-स्क्रिन फीचरचा वापर करणं गरजेचं आहे. याच्यामुळे एकाचवेळी एकापेक्षा अधिक अ‍ॅप्सचा वापर करता येतो.