Google Pixel 3 & Pixel 3XL : लाँचिंगआधीच फोटो लीक झाले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:40 PM2018-10-08T14:40:51+5:302018-10-08T14:43:31+5:30

गुगलचा नवा फ्लॅगशिप फोन गुगल पिक्सल 3 आणि 3 एक्सएल या फोनचे लाँचिंग उद्या होणार आहे. मात्र, या दोन्ही फोनचे फोटो लाँचिंगपूर्वीच व्हायरल झाल्याने गुगल हैराण झाली आहे.

फुटलेल्या माहितीनुसार Pixel 3 XL मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. तर Pixel 3 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. तर Pixel 3 XL मध्ये मागील बाजुला फिंगर प्रिंट सेन्सर आणि ड्युअल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार Pixel 3 XL मध्ये 6.2 इंचाचा QHD+ डिस्प्ले 1440 x 2880 रिझोल्यूशनचा असणार आहे. पिक्सलचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असेल.

फुटलेल्या माहितीनुसार Pixel 3 XL मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे.

दोन्ही फोनमध्ये वायरलेस चार्जिंग असणार आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. तसेच पाय ऑपरेटींग सिस्टिम असणार आहे.