फेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 02, 2018 5:23pm

फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहितीये का? फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला कलरब्लाइंडनेस आहे.फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.
फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला कधीही ब्लॉक करता येणार नाही.
फेसबुकचा वापर करोडो युजर्स करतात. दुनियेतील जवळपास प्रत्येक देशात फेसबुकचा वापर केला जातो. पण चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशात फेसबुक बॅन आहे.
आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलबद्दल आपण फेसबुकवर त्यासंबंधी रिपोर्ट करू शकतो. फेसबुक अशा प्रोफाइलला मेमोरलाइज्ड अकाऊंट करतं.ज्याचा वापर त्या मृताचं कुटुंबीय व मित्र करू शकतात. ही लोक मृत व्यक्तीच्या टाईमलाईनवर जाऊन काहीही शेअर करून जुन्या गोष्टी ताज्या करू शकतात. या अकाऊंटला कुणीही लॉग- इन करू शकत नाही. तसंच या अकाऊंटमध्ये कुठलाही बदल करता येत नाही.
फेसबुकवर 'पोक' नावाचं एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ व उपयोग काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही. पण वास्तवातही यामागे काहीही अर्थ नाही. मार्क झुकरबर्गला फेसबुकमध्ये काहीही उपयोग नाही असं एक ऑप्शन हवं होतं. म्हणून त्याची निर्मिती झाली.
फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येतं, त्याचं नाव आधी 'AWESOME' असं होतं. पण ते बदलून LIKE केलं गेलं
फेसबुकचा अतीवापर एका आजाराला निमंत्रण देत असतं. ज्याला फेसबुक अॅडिक्शस डिसऑर्डर असं नाव दिलं गेलं आहे. दुनियेतील करोडो लोक या आजाराने ग्रासले आहेत.

संबंधित

'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील
#HappyNewYearWishes : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे 'मेसेज'
या 7 डेटींग टीप्स वाचून घ्या रिलेशनशिपचा निर्णय
आकाश अंबानीच्या लग्नपत्रिकेचं व्हायरल सत्य...पत्रिका खरी की खोटी ?
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट कोणी टाकायची हे ॲडमिन ठरवणार

तंत्रज्ञान कडून आणखी

आयफोन X ची बुकिंग भारतात आजपासून सुरू
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
गुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त
अॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X

आणखी वाचा