आयफोन X ची बुकिंग भारतात आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 09:01 PM2017-10-27T21:01:02+5:302017-10-27T21:15:30+5:30

अॅपल कंपनीचा बहुप्रतिक्षित महागडा फोन आयफोन Xची बुकिंग भारतात आजपासून सुरू झाली आहे.

'आयफोन X' हा अॅपलचा पहिला फोन आहे, ज्याला होम बटण नाही. खालून वरच्या दिशेनं स्वाइप केल्यावर होममध्ये जाता येतं.

64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल.

'आयफोन X'मध्ये फिंगर प्रिंट सेन्सर नाही. चेहरा ओळखून फोनचा अनलॉक होतो. यातील इन्फ्रारेड कॅमेरा अंधारातही चेहरा ओळखू शकतो.

आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा

64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल.

६४ जीबीच्या फोनची किंमत 89,000रुपये आहे तर, 256जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 1,02,000 रुपये आहे.