स्मार्टफोनच्या ब्लू लाईटमुळे येऊ शकतं अंधत्व; असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:25 PM2019-04-24T12:25:03+5:302019-04-24T12:32:30+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. अनेकांना रात्रीच्या वेळी अंधारात स्मार्टफोन वापरण्याची सवय असते. मात्र मोबाईलमधून निघणारी ब्लू लाईट डोळ्यांसाठी घातक असते. त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

ऑप्टिकल केमिस्ट्री रिसर्चनुसार, ब्लू लाईट ही डोळ्यातील रेटिनामध्ये असलेल्या सेल्स किर्ल्समध्ये बदलते. याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. ब्लू लाईटमुळे अंधत्व येऊ शकतं.

सतत ब्लू लाईटमध्ये काम केल्यास डोळ्यांसंबंधीत अनेक आजार होण्याची शक्यता ही अधिक असते. याचा परिणाम इतका वाईट होतो की व्यक्ती त्यांची दृष्टी गमावू शकतात.

डोळ्यांवर ब्लू लाईटचा परिणाम होऊ नये यासाठी स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जाऊन ब्लू लाईट फिल्टर किंवा नाइट मोड ऑप्शन ऑन करा. तसेच तुम्ही हाय-क्वालिटी स्क्रीन प्रोट्क्टर्स सुद्धा निवडू शकता.

सतत तुम्ही संगणकावर काम करत असाल तर डॉक्टरांकडे जाऊन डोळे चेक करा. डोळ्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

अंधारात अनेकांना फोन वापरण्याची सवय असते. मात्र अशी सवय असल्यास ती तातडीने बदला. त्याचा डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चष्मा लावत असाल तर हाय क्वालिटी लेन्सची निवड करा. कारण ते ब्लू लाईट आणि यूवी फिल्टरसोबत येतात.

दिवसातून काही वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. तसेच डोळ्याची काळजी नीट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.