बहुचर्चित ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 07:49 PM2017-08-01T19:49:55+5:302017-08-01T19:55:29+5:30

जागतिक मोबाईल मार्केटमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी KEYone स्मार्टफोनची खाशियत QWERTY कीबोर्ड आहे.

यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर केली जाणार असून याची किंमत 39,990 रुपये इतकी आहे.

लॉन्चिंग ऑफर म्हणून या स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने 75 जीबी डाटा देण्यात येणार आहे.

ब्लॅकबेरी KEYone स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat आहे.