#BestOf2018 : स्मार्टफोनमध्ये वर्षभरात 'हे' ट्रेंड ठरले टॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 03:51 PM2018-12-28T15:51:23+5:302018-12-28T16:09:08+5:30

स्मार्टफोनचा वापर मोठया प्रमाणावर वाढला असल्याने स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या युजर्ससाठी नवनवीन ट्रेंड्स आणत असतात. 2018 या वर्षातील स्मार्टफोनमधील टॉप ट्रेंड्सबाबत जाणून घेऊया.

The ubiquitous notch - BEZEL-LESS DISPLAY हा सध्याचा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा ट्रेंड आहे. Galaxy S8 या ट्रेंडची सुरुवात केली. तसेच Apple ने iPhone X मध्ये notch invent केल्यानंतर notch copy करण्याचा एक ट्रेंड आला आहे. iPhone X चा डिस्प्ले पाहिल्यास वर screen inserter दिसेल त्यामध्ये Apple ने स्मार्टफोनचा कॅमेरा सेक्शन insert केला आहे. तसेच या सेक्शनमध्ये front camera आणि face detection sensor आहे. आता अनेक स्मार्टफोनमध्ये notch आहे.

Value flagship smartphones - सामान्य ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून भारतात 20,000, 30,000च्या बजेटमधील स्मार्टफोन बनवले जात होते. परंतु वन प्लसनंतर असूस, शाओमी आणि हॉनरसारख्या मोबाईल कंपन्यांनीही अनेक फीचर्सचा समावेश असलेले स्मार्टफोन तयार करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कमी बजेटमध्ये ZenFone 5Z (Review), Poco F1 (Review) आणि Honor Play ₹ 16,999 (Review)सारखे स्मार्टफोन खरेदी करता येते.

Artificial Intelligence - स्मार्टफोनमध्ये Artificial Intelligence हा एक महत्त्वाचा ट्रेंड आहे. Qualcomm's new Snapdragon 855 मध्ये मल्टी-कोर AI इंजिन आहे. तसेच Computer Vision ISP आहे ज्यामुळे एखाद्या वस्तूच्या अथवा चेहऱ्याच्या मदतीने ओळखणे सोपे जाते. iPhone X मध्ये Face Detection Unlock Feature अॅड करण्यात आले होते. मात्र Notch प्रमाणेच Face Detection Unlock Feature इतर स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी कॉपी केले. त्यामुळेच आता अनेक स्मार्टफोनमध्ये हे फीचर असून सध्या त्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

Glass backs - iPhone X आणि Samsung's Galaxy S series च्या स्मार्टफोमध्ये ग्लास बॅक देण्यात आले आहे. Glass backs ला युजर्स जास्त पसंती देतात. केवळ महागड्या स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक नसून Nokia 5.1 Plus (9,999), Honor 8X आणि Realme C1 (7,499) या स्मार्टफोनमध्येही ग्लास बॅक देण्यात आले आहे.

Rise of Android One/ stock Android - Android One हे बजेट स्मार्टफोनसाठी OS च्या रुपात लाँच करण्यात आले होते. 2018 मध्ये Motorola आणि Infinix सारख्या अनेक स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी Android One programme जॉईन केला आहे.

In-display fingerprint sensor - California च्या Synaptics या कंपनीने In-Screen Fingerprint Sensor चा शोध लावला. ही Technology Samsung आणि Apple ने सर्वप्रथम आणली. त्यानंतर इतर स्मार्टफोन कंपन्यांनी Technology आत्मसात केली. आता In-Screen Fingerprint Sensor Technology हा एक महत्त्वाचा ट्रेंड आहे.

The rise of USB-Type C - 2014 मध्ये USB-Type C तयार करण्यात आले होते. मात्र आता स्मार्टफोनमध्ये USB-Type C चा ट्रेंड पाहायला मिळत आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर वेगवान होण्यासाठी USB-Type C ची अत्यंत मदत होते. अॅपलने लॅपटॉप आणि डेस्कटॉप लाईनमध्ये USB-Type C स्विकारले आहे.

Fast charging becomes affordable - स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने चार्जिंग अत्यंत महत्त्वाचे असते. फोन लवकर चार्ज व्हावा यासाठी 2018 मध्ये अनेक नवनवीन गोष्टी स्मार्टफोनमध्ये अॅड करण्यात आल्या आहेत. Nokia 6.1 Plus आणि Motorola One Power (14,999) मध्ये फास्ट चार्जिंग हे फीचर देण्यात आले आहे.

Multiple cameras everywhere - स्मार्टफोन घेताना आता सर्वप्रथम त्याचा कॅमेरा पाहीला जातो. सध्या तरुणाईमध्ये selfieची क्रेझ असल्याने उत्तम कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. 16MP, 20MP आणि 24MP चे कॅमेरे असतात. DUAL CAMERA अनेक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. Rear Dual Camera नंतर Front Dual Camera असलेले स्मार्टफोन लाँच झाले आहे. त्यामुळे Multiple camera हा एक ट्रेंड आहे.