व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट कोणी टाकायची हे ॲडमिन ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 02:53 PM2017-12-04T14:53:37+5:302017-12-04T14:55:57+5:30

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सॲपने ॲडमिनला दिला आहे.

मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय ॲडमिन घेईल.

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल, असंही बोललं जात आहे.

ॲडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधील सदस्याला ‘मेसेज ॲडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो ॲडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.