आपल्या आजूबाजूचं असं जग जे आपल्या डोळ्यांपासून लपलेलं असतं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:50 PM2019-03-25T14:50:32+5:302019-03-25T14:59:32+5:30

आपण सगळेच एका रंगीबेरंगी जगात जगत असतो. पण हे जग बाहेरून बघताना फारच चांगलं वाटतं. पण याच्या मागचं सत्य अनेकांना माहीत नसतं. एका नाण्यला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य अनेकांना माहीत नसतं. अशाच काही खास गोष्टींचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. (All Photo Source: boredpanda)

१) प्रशांत महासागराच्या द्वीपावर असलेले इस्टर जाएंट हेड ज्यांना मोआई असेही म्हटले जाते. याबाबत नेहमीच लोकांना उत्सुकता असते. असे म्हटले जाते की, १२व्या आणि १५व्या शतकादरम्यान पोलिनेशियंसने हे तयार केले होते. पण मूर्तीचे केवळ डोकेच दिसतात. मात्र एकदा करण्यात आलेल्या खोदकामातून त्यांचं पूर्ण शरीरही समोर आलं आहे.

२) तुम्हाला जर वाटत असेल की, बटाट्याचा शोध भारतात लागला तर तुम्ही चुकताय. बटाट्याचा शोध सन १५३७ मध्ये बोलिविया आणि पेरूच्या इंडीजमध्ये लागला होता. बटाटा ही अमेरिकन लोकांची फेव्हरेट भाजी आहे. बटाटे गोदामात कसे दिसतात हे या फोटोतून बघायला मिळतं.

३) अशाप्रकारे स्वत:ला आसनात ठेवतात चायनीज सैनिक...पीपल पॅरामिलिट्री पोलिसांची एक कठीण ड्रिल असते. ज्यात त्यांचं पोश्चर चेक केलं जातं. तेव्हा त्यांच्या ड्रेसमध्ये अशी पिन लावली जाते.

४) बिस्कीट किंवा कुकीजची आवड तर सर्वांनाच असते. पण तयार कसे केले जातात हे अनेकांना माहीत नसतं. या फोटोत दिसणाऱ्या मशीनद्वारे बिस्कीट तयार केले जातात. सर्वातआधी ही मशीन १८३९ मध्ये स्वीडनमध्ये तयार करण्यात आली होती.

५) स्नाइपर्ससाठी विशेष जागा - कोणत्याही मोठ्या इव्हेंट, कॉन्सर्ट किंवा खेळाच्या मैदानात एक छोटं कॅबिन स्नायपर्ससाठीही असतं. या स्नायपर्सना आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी तैनात केलं जातं.

६) Verdun या ठिकाणी पहिलं वर्ल्ड वॉर झालं होतं. ३०३ दिवस चाललेल्या या युद्धात ७१४, ३२१ लोक मारले गेले होते. आता हे ठिकाण असं दिसतं.

७) स्पेसमधून ग्रहण कसं दिसतं - जमिनीवरून ग्रहणाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण स्पेसमधून ग्रहण कसं दिसतं हे तुम्ही या फोटोतून बघू शकता. या फोटोतून तुम्ही चंद्राची सावली पृथ्वीवर पडत आहे.

८) स्ट्रॉबेरीच्या आतील फोटो - स्ट्रॉबेरी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. त्यातील बिया फारच छोट्या असतात. Alexey Kljatov नावाच्या एका फोटोग्राफरने स्ट्रॉबेरीच्या सरफेसचा फोटो क्लिक केला आहे.

९) स्पर्म व्हेल ही इतर व्हेलपेक्षा आकाराने फार मोठी असते. या व्हेलची अनोखी बाब ही असते की, याचे दात केवळ एकाच बाजूने असतात.

१०) सिंगल अॅटम म्हणजेच अणूच्या या फोटोला सायन्स फोटो कॉन्टेस्टमध्ये पारितोषिक मिळालं आहे. हा फोटो ऑस्कफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या David Nadlinge यांनी काढला आहे.

११) हे काही विजेचे तार नाहीत. हे आहे हत्तीचं शेपूट. हत्तींची शेपटी त्यांच्या फारच कामाची असते. कारण ते शेपटीच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असतात.

१२) या फोटोत तुम्ही डायनॉसॉरच्या पायाच्या ठसा बघू शकता. हा ठसा २०० मिलियन वर्ष जुना आहे.

१३) मिठाची खाण अशाप्रकारे दिसते.

१४) स्पेससूट - याचं वजन २८० पाउंड इतकं असतं. पण स्पेसमध्ये गेल्यावर याचं वजन फार राहत नाही. हा सूट अंगावर चढवण्यासाठी ४५ मिनिटे वेळ लागतो. याचा रंग पांढरा असतो कारण त्यामुळे हीट रिफ्लेक्ट होते.

बोइंग 787 विमान आतून कसं दिसतं.