सेलिब्रिटींच्या थेट 'बेड रूम'पर्यंत पोहोच असलेला 'कॉमन मॅन' सोशल मीडियावर हिट; तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:00 PM2019-01-25T16:00:16+5:302019-01-25T16:15:10+5:30

सोशल मीडियात एडिटींग केलेले अनेक फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यात सेलिब्रिटींसोबत एडीट केलेल्या फोटोंची वेगळीच मजा येते. अशातच इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीचे फोटो जरा जास्तच चर्चेत आले आहेत. त्याने सेलिब्रिटींसोबत त्याचे फोटो एडीट केले आहेत, पण या फोटोंची एक वेगळी खासियत आहे. या फोटोंचं एडिटींग फारच शिताफीने केली आहे. हे फोटो पाहून हसण्यासोबतच या व्यक्तीकडून एडिटींगही शिकण्यासारखी आहे.