रतन टाटा यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं? बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:57 PM2018-09-19T12:57:51+5:302018-09-19T13:05:33+5:30

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे भारतातील टॉपच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. टाटा ग्रुपला मोठं केल्यानंतर आता रतन टाटा यांनी रिटायरमेंट घेतलं आहे आणि आरामात जगण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. रतन टाटा हे आपल्या तल्लख बुद्धीसोबतच आपल्या लाइफस्टाइलसाठीही ओळखले जातात. त्यामुळे ते कसे राहत असतील? त्यांचं घर कसं असेल? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. चला तर आज रतन टाटा यांच्या घराच्या आतून फेरफटका मारुयात...

रतन टाटा हे मुंबईतील कुबाला परिसरात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहतात. या बंगल्याचा आकार आणि प्रकार पाहून याला महल म्हणावेसे वाटेल. पांढऱ्या रंगांच्या या महलाला रतन टाटा यांनी त्यांच्या स्वप्नातील घराप्रमाणे सजवले आहे.

रतन टाटा यांचं हे घर मुंबईमध्ये वास्तुकलेचा अद्भुत नजराना आहे. समुद्र किनाऱ्यावर १३, ३५० स्क्वेअर फूट परिसरात पसरलेल्या या घराला पाहिल्यावर एखाद्या आयलंडसारखं फिलिंग येतं. रंगरंगोटीपासून ते घरातील प्रत्येक कलाकृतीचं काम रतन टाटा यांच्या हिशोबाने केले आहे.

या घराच्या समोरील बाजून एक शानदार गार्डन तयार करण्यात आलं आहे. या गार्डनमध्ये रतन टाटा हे रोज आपल्या श्वानांसोबत फिरणे पसंत करतात.

रतन टाटा यांच्या घराला सुरक्षेचं मोठं कडं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी या घराबाहेर एक अख्खी फौज उभी असते. त्यानंतर आत आल्यावर एक आलिशान वेटींग रुम आहे. इथे दोन काऊच ठेवले आहेत.

वेटीं रुम आणि गेस्ट रुमदरम्यान एक शानदार स्वीमिंग पूलही आहे. हा स्वीमिंग पूल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, बाहेर कितीही उन असलं तरी यावर मात्र सावलीच राहणार.

घराच्या आत एक सुंदर मंदिरही तयार करण्यात आलं आहे. यात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे.

रतन टाटा यांच्या या ३ फ्लोरच्या बंगल्याला ७ लेव्हलमध्ये विभागण्यात आलं आहे. फर्स्ट फ्लोरमध्ये लिविंग रुम आणि वरच्या भागात सन डेक तयार करण्यात आला आहे. त्यासोबत यात एक स्टडी रुमची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

कोणत्याही फ्लोरवर गेल्यास कशाचीही कमतरता दिसणार नाही. दुसऱ्या फ्लोरच्या खालच्या भागात ३ बेडरुम आणि लायब्ररी तयार करण्यात आली आहे.

तिसऱ्या फ्लोरच्या खालच्या भागात एक बेडरुम, एक मीडिया रुम आणि जिम आहे. या फ्लोरच्या वर दुसरा स्वीमिंग पूल, एक लाऊंज आणि एक सन डेक आहे.