जगातले ६ फेमस जादूगार ज्यांचा स्टंट करतानाच झाला शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:26 PM2019-06-22T16:26:36+5:302019-06-22T16:36:10+5:30

काही दिवसांपूर्वीच कोलकाताचा जादूगार चंचल लाहिरीला लोकांचं मनोरंजन करणं त्याच्या जीवावर बेतलं. चंचलने हाता-पाय साखळीने बांधून क्रेनच्या मदतीने नदीत जाऊन परत येण्याचा दावा केला होता. पण असं झालं नाही आणि चंचलचा नदीच्या पाण्यातच मृत्यू झाला. जादूगारासोबत अशाप्रकारे झालेली ही पहिलीच घटना नाहीये. याआधी अनेक जादूगारांना स्टंट करताना जीव गमवावा लागला आहे.

१) JOE BURRUS AND THE CEMENT - Joe Burrus ला Amazing Joe नावानेही ओळखलं जात होतं. Coffin आत बंद स्वत:ला बंद करून घेत तो एक अॅक्ट करत होता. या Coffin वर सीमेंट टाकलं गेलं होतं. Joe ने दावा केला होता की, तो सुरक्षित Coffin मधून बाहेर येणार. पण असं झालं नाही.

२) PRINCESS TENKO AND THE 10 SWORDS - Princess Tenko आपल्या Costumes Performance साठी ओळखली जात होती. एका अॅक्ट दरम्यान तिने तिच्या कपड्यांवर १० तलवारी बांधल्या जात होत्या. यात जराही चूक झाली तर तिचा जीव जाणार अशी स्थिती राहत होती. अशाच एका अ‍ॅक्टमध्ये तिचा मृत्यू झाला.

३) CHARLES ROWAN AND THE SPEEDING CAR - एका कार स्टंटदरम्यान Charles Rowan चा मृत्यू झाला होता. या स्टंटमध्ये त्याला कारपेक्षा अधिक वेगाने धावायचे होते. (Image Credit : unsplash.com)

४) GENESTA AND THE MILK CAN - Royden Joseph Gilbert Raison de la Genesta ला पाण्याने भरलेल्या टॅंकमध्ये करायचा होता. ज्यात तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. (Image Credit : Entertainment | HowStuffWorks)

५) BALABREGA AND THE FLAMING MOTHS - Balabrega हा जादूगार आगीत एक स्टंट करण्यात असफल राहिला होता. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

६) BENJAMIN RUCKER AND THE LIVING BURIAL - १९३४ मध्ये प्रसिद्ध जादूगार Benjamin ने स्वत:ला जमिनीत गाडल्यानंतर स्वत:ला जिवंत ठेवलं. पण हा अ‍ॅक्ट त्याचा शेवटचा अ‍ॅक्ट ठरला. कारण त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.