अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 01:13 PM2018-04-13T13:13:08+5:302018-04-13T13:13:08+5:30

सातारा : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील घुमाईदेवी मंदिर परिसरात केशरी चित्रपटासाठी उभारलेल्या सेटवर अभिनेता अक्षयकुमार आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

गुरुवारी(दि.12) या सेटवर खासदार उदयनराजे भोसले यांनी एन्ट्री केली. यावेळी अक्षयकुमार आणि उदयनराजेंनी एकमेकांना अलिंगन देत गळाभेट घेतली.

यावेळी दोघांनीही एकमेकांशी बराचवेळ संवाद साधला. पिंपोडे बुद्रुकगावाजवळ घुमाईदेवी मंदिर परिसरात अभिनेता अक्षयकुमार याच्या केशरी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

दरम्यान, अभिनेता अक्षयकुमार याने वॉटर कपच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकमध्ये श्रमदान केले आहे.

आठ दिवसांपूर्वीच त्याने पिंपोडे ग्रामस्थांशीही संवाद साधत २५ लाखांची आर्थिक मदत देऊ केली होती.

यावेळी अभिनेता अक्षयकुमारला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.