मुली प्रपोज करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत?, ही आहेत कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:27 PM2018-10-17T15:27:01+5:302018-10-17T15:38:06+5:30

1.नकाराची भीती : मुली आवडत्या व्यक्तीला आपणहून प्रपोज न करण्यामागील मोठं कारण म्हणजे नकाराची भीती. आवडत्या व्यक्तीनं दिलेल्या नकाराचा सामना मुली करू शकत नाही, असे म्हटले जाते. त्या उलट याबाबतीत मुलं अगदी बिनधास्त असतात. मुलींना दिलेला नकार कसा पचवायचा, हे त्यांना चांगलंच माहिती असतं.

2. तो माझ्याबद्दल काय विचार करेल? : आपल्याबद्दल कोणीही मत निर्माण करावीत, हे कोणत्याही मुलीला कधीही पसंत नसते. कदाचित याच कारणामुळे त्या स्वतःहून मुलांना प्रपोज करत नाही. आधी मी प्रेम व्यक्त केलं तर समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल?, हा विचार करुन ती पाऊल पुढे टाकत नाही.

3. तो कमिटेड असेल तर ? : आपल्याला आवडणारी व्यक्ती कमिटेड रिलेशनमध्ये असल्यास, या विचाराने काही जणी आपल्या भावना व्यक्त करत नाही. अशा कित्येक प्रश्नांची उत्तर न मिळवताच मुली आवडत्या व्यक्तीला प्रपोज न करणंच पसंत करतात.

4. स्वतःला कमी लेखणं : काही जणींना स्वतःला कमी लेखण्याची प्रचंड वाईट सवय असते. आपल्या आवडत्या व्यक्तीमध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगले गुण आहेत, समोरची व्यक्ती श्रेष्ठ आहे, असे स्वतःच मत बनवून कित्येकजणी प्रेमाचा त्याग करतात.

5. त्याचा स्वभाव चांगला असेल ना? आपल्या पार्टनरनं आपल्यावर बिनशर्त प्रेम करावं, सन्मान करावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मुली चेहरा पाहून कधीच प्रेम करत नाहीत, त्यापेक्षा त्यांना स्वभाव अधिक महत्त्वाचा वाटतो. मुलाचा स्वभावच चांगला नसला तर मुली आपलं प्रेम व्यक्त करतच नाहीत.