#ValentineWeek2018 : 'टेडी डे'ला कसं कराल मुलीला इंप्रेस, पाहा कोणत्या टेडीने होतात मुली खुश!

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 7:26pm

मुंबई : फेब्रुवारी महिना आला म्हणजे वातावरणातच प्रेमाचे तरंग उठू लागतात. व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त सगळेच रोमँटीक मुडमध्ये असतात. एव्हाना अनेकांचे प्लॅनसुध्दा तयार आहेत.
काळानुरुप सगळ्याच पध्दती बदलल्या आहेत. आता हे सेलिब्रेशन फक्त व्हॅलेंटाईन्स डेपुरतं मर्यादित राहिलं नाहीये. रोझ डेपासून सुरु असलेलं हे सेलिब्रेशन आता सलग ८ दिवस व्हॅलेंटाईन डेपर्यंत केलं जातं.
आज १० फेब्रुवारी म्हणजेच टेडी डे. मुलींना टेडी किती आवडतात हे तर सगळ्यांना माहित्येय. मऊ, गुबगुबीत आणि गोड-गोंडस टेडी सगळ्यांनाच आवडतो. हल्ली तर मिकी माऊस, डोनाल्ड डक, पँडा, मिनी माईस, मिनिअन हेसुध्दा टेडी स्वरुपात अनेकांच्या घरात, बॅग्जवर, मोबाईलला, की-चैन म्हणून पाहायला मिळतात.
हल्ली तर मोठ्या टेडींपेक्षा की-चैन टेडींचं फॅड सगळ्यात जास्त आहे. हे की-चैन टेडी दिवसभर बॅग किंवा मोबाईल की-चैनच्या स्वरुपात आपल्याजवळ असतात. त्यातही पिंक टेडी मुलींना सगळ्यात जास्त आवडतो आणि रेड टेडी त्यांना आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून आपल्या प्रेमाला उजाळा नेहमी देतो.
तरीही मोठ्या टेडीची मज्जाच निराळी आहे. कारण आपल्याला त्याला मिठी मारता येते. म्हणूनच असा मोठा टेडीसुध्दा अनेकांचा फेव्हरीट आहेच. कारण त्याला मिठी मारल्यावर तो गिफ्ट करणाऱ्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.
टेडीसोबत एक सुंदरसा, ताज्या लाल गुलाबांचा गुच्छ, चॉकलेट किंवा एखादी अंगठी देऊन मुलीला सहज इंप्रेस करु शकता. कारण हे सरप्राईज त्यांच्यासाठी नक्कीच कधीच न विसरण्यासारखं असेल. यानंतर कोणतीच मुलगी तुम्हाला नाही बोलू शकत नाही.

संबंधित

लग्न कधी करावं?... 'या' ५ गोष्टी नक्की दाखवतील दिशा
व्हॅलेंटाइन डे निमित्त करण जोहरची 'सिंगल' अभिनेत्यांसाठी पार्टी
#ValentineDay2018 : मेकअपमध्ये करु नका या ५ चुका, नाहीतर व्हॅलेंटाईन डेला लुकसहीत दिवसही होईल खराब
Chocolate day : ऐकून थक्क व्हाल 'या' चॉकलेटसच्या किंमती

रिलेशनशिप कडून आणखी

या ४ कारणांमुळे मुलं कमिटमेंटपासून राहतात दूर
मुलींना प्रपोज करण्याच्या या ५ टीप्स नक्की वाचा.
या 7 डेटींग टीप्स वाचून घ्या रिलेशनशिपचा निर्णय
या ५ गोष्टी पार्टनरसाठी कधीच करू नका

आणखी वाचा