उन्हाळ्यात मुलांच्या तब्येतीची काळजी घेताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 11:54 AM2019-05-19T11:54:40+5:302019-05-19T12:03:39+5:30

तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लहान मुलांच्या आरोग्यावर उन्हाचा जास्त परिणाम होत असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मुलं खेळण्यासाठी बाहेर पडतात. पण अशावेळी कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात जास्त तहान लागते तसेच शरिराला पाण्याची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे मुलांना जास्त पाणी प्यायला सांगा. यामुळे सन स्ट्रोकपासून त्यांचा बचाव होईल.

लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. पोषक घटक असलेल्या घटकांचा आहारामध्ये समावेश करा. वेगवेगळ्या फळांचा रस त्यांना आवर्जून प्यायला द्या.

मुलांना उन्हामध्ये 3 तासांपेक्षा जास्त वेळ राहू नका. वातारणातील उकाडा वाढलेला असतो. ज्यामुळे चक्कर येणं आणि डोकेदुखी यांसारख्या गोष्टींचा धोका वाढतो.

उन्हाळ्यात मुलांना सूती कपडे घाला. जेणे करून त्यांना जास्त घाम येणार नाही. तसेच गडद रंगाचे कपडे न वापरण्याचा सल्ला द्या.

उन्हाळ्यात सुट्टी असल्याने मुलं घराबाहेर जास्त वेळ खेळत असतात. अशावेळी त्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी त्यांन सनस्क्रीम लावा.

खेळताना मुलांना तहान लागल्यामुळे ते घराबाहेर कोणत्याही ठिकाणी पाणी, सरबत पितात किंवा गोळा खातात. पण मुलांच्या आरोग्यासाठी ते घातक असल्याने मुलांना समजून सांगा.

वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.