या ४ कारणांमुळे मुलं कमिटमेंटपासून राहतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 06:33 PM2018-01-09T18:33:30+5:302018-01-09T18:37:30+5:30

अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेली बरीच मुलं कमिंटमेंट द्यायला तयार नसतात. त्यांच्या प्रेयसी अनेकदा असा हट्ट त्यांच्याकडे करत असतात. तुमच्याही बाबतीत अनेकदा हे घडलंच असेल. तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे मुलं रिलेशनशिपमध्ये कमिंटमेंट द्यायला तयार होत नाही.

१) कमिटमेंट आली म्हणजे लग्न आलं, लग्न आलं म्हणजे मुलं आली आणि याच सगळ्या जबाबदाऱ्यांना मुलं घाबरतात. आपण जबाबदारी घेऊ शकु की नाही याबाबत त्यांना शाश्वती नसते. त्यापेक्षा त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय सोपा वाटतो.

२) सगळ्याच बाबतीत स्त्रीया पुरुषांपेक्षा जास्त लवकर प्रगल्भ होतात. त्या नाती सांभाळण्यासाठी तयार असतात. मात्र मुलांना त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपलं स्वातंत्र्य कमी होईल वगैरे गोष्टींची त्यांना भीती वाटत असते. इतर सगळं सांभाळत जुळवून घेणं आणि तडजोडी करणं याला ते तयार नसतात.

३) पुर्वी अपयशी ठरलेल्या अशा रिलेशनशिप ते अजूनही विसरलेले नसतात. कमिटेड असूनही त्यांचा ब्रेकअप झालेला असतो. ते नातं फुलण्याआधीच कमिटमेंट दिल्याने त्यांच्या वाटेला दगा आलेला असतो. याचं दु:ख किंवा ओझं अजूनही त्यांच्या मनावर असतं.

४) काहीवेळा मुलांचे आयुष्याचे प्राधान्यक्रम ठरलेले असतात. यात आधी करिअर, घर, गाडी वगैरे वगैरे नंतर शेवटी लग्न हा विषय असतो. त्यामुळे हातात काहीच नसताना कमिटमेंट देणं त्यांना पटत नाही किंवा जमत नाही. त्यांना अपेक्षित गोष्टी घडण्याआधीच त्यात इतर कोणताही अडथळा त्यांना नको असतो.