मुलींना प्रपोज करण्याच्या या ५ टीप्स नक्की वाचा.

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 7:30pm

मुलींना प्रपोज करणं आणि तिचं उत्तर नाही आलं तर? हा विचार करुनच अनेक मुलांना धडकी भरते. तिच्या मनात नेमकं काय आहे, हे ओळखणंसुध्दा तितकं सोपं नसतं. मग आपली तिच्यासोबतची मैत्री तुटू नये म्हणून मग काही मुलं आपल्या मनातलं तिला बोलूनच दाखवत नाहीत.
बहुतांश सर्वच मुलींना समुद्रकिनारे आणि चौपाटी फार आवडतात. आपल्या आवडत्या मुलीला काहीतरी निमित्त काढून समुद्रकिनारी घेऊन जा. तिच्यासोबत लांब रोमँटीक वॉक घ्या. तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारा. भुट्टा किंवा भेळ खा. दरम्यान तिच्या मुडचा अंदाज घेऊन तिला आपल्या मनातलं विचारुन घ्या. कदाचित ती तो क्षण सांभाळून घेईल.
मुलींना कॉफी पिताना गप्पा मारणं फार आवडतं. तुम्ही या मैत्रिणीसोबत बऱ्याचदा कॉफी प्यायला गेला असाल. तिची आवडती कॉफी ऑर्डर करुन त्यात ‘बी माईन’ लिहा. या वेगळ्या प्रकाराने केलेलं प्रपोज तिला नक्की आवडेल.
मुलींना गिटार वाजवणारी आणि गाणारी मुलं आवडतात. थोडं ‘शाहरुख खान स्टाईल’ वाटेल पण गिटार वाजवून तिला प्रपोज करण्याची आयडीया वर्क करु शकते. ती साहित्याची चाहती असेल तर एखादी कविता लिहा किंवा तिला म्युझिक कॉन्सर्टला घेऊन जा.
आईस्क्रीम आणि तेही चॉकलेट म्हणजे मुली विरघळणारच. आपल्या आवडत्या परीला एखादं कस्टमाईज आईस्क्रिम बॉक्स द्या. त्यात आपल्या मनातल्या भावना लिहा आणि तिच्यासमोर व्यक्त व्हा. आपली जवळची मैत्रीण म्हणजे तुम्हाला तिचा आवडता चॉकलेट फ्लेव्हर तर माहीत असेलच.

संबंधित

सेन्सेक्सने ओलांडला 35 हजारांचा टप्पा
मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर अत्याधुनिक दुमजली जम्बो शौचालय
समुद्रातील आलिशान क्रूझमध्ये मुंबईकरांची 'गुड इव्हिनिंग'!
घे भरारी! मुंबईत पतंगोत्सव उत्साहात
मुंबई : डोमेस्टिक विमानतळाला आग, जीवितहानी नाही

आणखी वाचा