लंबी जुदाई ! लाँग डिस्टन्स रिलेशनमध्येही तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणतील 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:36 AM2018-10-24T11:36:45+5:302018-10-24T11:57:06+5:30

1. एकमेकांच्या संपर्कात राहा : कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवाद आणि भेटे होणे फार गरजेचं आहे. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये या गोष्टी फार कमी प्रमाणात होतात. अशा परिस्थितीत जोडप्यांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. सेकंदासेकंदासाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची इच्छा असेल तर यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला जाऊ शकतो. स्काइप व्हिडीओ चॅट, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल किंवा जीमेल चॅट असे बरेचसे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.

2. छोट्यातील छोटी गोष्ट करा शेअर : दररोज पार्टनरच्या संपर्कात राहण्यासाठी छोट्यातील छोट्या गोष्टी तिच्या/त्याच्यासोबत शेअर करा. यामुळे पार्टनर आपल्यासोबत असल्याची जाणीव कायम राहते. शिवाय, दोघांचं नातं आणखी मजबूत होण्यात मदत होते.

3. सॉरी बोलण्यात कमीपणा येऊ नये : प्रेमळ नात्यामध्ये भांडणंही तितकीच होतात. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये वाद-भांडणं झाल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे नातं सांभाळण्यासाठी दोघांकडून प्रयत्न झाल्यास उत्तम. आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यास सॉरी बोलून मोकळं व्हा. सॉरी बोलल्यानं कोणत्याही प्रकारे कमीपणा येत नाही, उलट नात्यातील गोडवा अधिक वाढतो आणि दुरावा कमी होण्यास मदत होते. तुम्ही सॉरी बोललात तर तुमचा पार्टनरही तुम्ही लगेचच सॉरी म्हणेल, हा उपाय ट्राय करुन तर पाहा.

4. रोमँटिक मूड : आपल्या दिवसाची सुरुवात एकमेकांना रोमँटिक मेसेज पाठवून करा. याद्वारे आपल्या पार्टनरवर तुमचे किती प्रेम आहे आणि तुमच्या आयुष्यात त्यांचे किती महत्त्व आहे, याची जाणीव त्यांना करुन द्यावी.

5. पार्टनरवर विश्वास ठेवा : नात्यामध्ये प्रेमानंतर कोणती महत्त्वाची असेल तर ती आहे विश्वास. विश्वासावर कोणतेही नाते टिकलेले असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कोणासोबत फिरायला जात आहात तर याबाबतची माहिती तिला/त्याला द्या, खोटं बोलणं टाळा, गोष्टी लपवू नका. यामुळे कोणत्याही शुल्लक कारणावरुन तुमच्यात वाद होणार नाहीत.