Chocolate day : ऐकून थक्क व्हाल 'या' चॉकलेटसच्या किंमती

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 1:58pm

वॅलेंटाइन वीकचा तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. डार्क चॉकलेट आणि ट्रफल ऑईलपासून बनणा-या ला मेडलिन अ ट्रफल चॉकलेटची प्रति पाउंड किंमत 65 हजार रुपये आहे. ऑर्डर देऊन तुम्हाला हे चॉकलेट बुक करावे लागते.
रिचर्ड डोनली चॉकलेट पूर्णपणे हाताने बनवले जाते. त्याची किंमत 5 हजार रुपये आहे.
सिगारेटची नक्कल असलेल्या अफिकियोनाडो चॉकलेटमधून सिगरेटसारखाच वास येतो. या चॉकलेटच्या प्रति बॉक्सची किंमत 18 हजार रुपये आहे.
28 देशातील दुर्मिळ कोकोपासून फ्रोजन हॉट चॉकलेट बनवले जाते. 16 लाख रुपये या चॉकलेटची किंमत आहे.
वॉउस चॉकलेटची किंमत प्रति पाऊंड 4,500 रुपये आहे. कोकोनट, इंडियन करी, मिल्क चॉकलेट फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेल्या या चॉकलेटसला तुम्हाला नकार देता येणार नाही.

आणखी वाचा