अभ्यासासहीत मुलांच्या छंदांकडेही द्या लक्ष, घडेल त्यांचं चांगलं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:43 PM2018-08-31T15:43:24+5:302018-08-31T15:45:35+5:30

अभ्यासासहीत मुलांच्या छंदांकडेही द्या लक्ष, घडेल त्यांचं चांगलं भविष्य आपलं मुलं खूप हुशार असावं, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आपला मुलगा किंवा मुलगी मागे पडू नये, यासाठी काही आई-वडील आपल्या मुलांना वारंवार ओरडत, मारझोड करत असतात. आपले निर्णय ते आपल्या मुलांवर लादत असतात. यामुळे मुलांना आपले छंद पूर्णपणे जोपासता येत नाही. मुलांनी अभ्यास करावाच पण असा कुठेही नियम नाही की त्यांनी नेहमी पहिला नंबर काढावा. काही मुलं अन्य उपक्रमांमध्ये अव्वल स्थानी असतात. त्यामुळे जर तुम्ही मुलांच्या आवडीनिवडीची योग्यरित्या काळजी घेतली तर मुलंही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील. 1. ज्या मुलांना मेंदूला चालना देणारी कोडी, सामान्य ज्ञान याबाबतीत माहिती वाढवणं अधिक स्वारस्य असते. ते गणित विषयात हुशार असतात. जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत ही मुलं हार मानायला तयार होत नाहीत. त्यामुळे इतर विषयांमध्येही या मुलांनी पैकीच्या पैकी गुण मिळवावेत, हे गरजेचं नाही. आईवडिलांनी अशा पद्धतीच्या खेळांमध्ये मुलांची साथ द्यावी, जेणेकरुन गणिताच्या माध्यमातून त्यांचं करिअर घडण्यात मदत होईल.

2. भाषांचं ज्ञान : बऱ्याच लहान मुलांना दुसऱ्या भाषा शिकण्यात खूप आवड असते. कठिणातील कठीण शब्दही ते खूप सहजरित्या बोलतात. अशी मुलं विविध भाषांमध्ये आपले चांगले करिअर घडवू शकता.

3. संगीताची आवड : काही मुलांना संगीत व गाण्याची फार आवड असते. यावेळेस मुलांना अभ्यासासोबत संगीत, गायनाचा क्लास लावावा. ही मुलं गायक किंवा संगीतकार म्हणून घडू शकतात.

4. खेळाची आवड : बऱ्याचदा आपण ऐकतो की आईवडील आपल्या मुलांना सांगत असतात, अभ्यास करा...खेळण्या-बागडण्यानं काहीही होणार नाही. आईवडिलांचं म्हणणं चुकीचे असते असे नाही, मात्र आता अभ्यासाव्यतिरिक्त खेळातही करिअर घडवणे शक्य झाले आहे. जर मुलांना क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळांमध्ये आवड असेल तर त्यांना प्रशिक्षण द्यावे.