जाणून घ्या वयानुसार लहान मुलांनी कोणती अॅक्टिव्हिटी करावी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:52 PM2018-10-04T14:52:44+5:302018-10-04T14:57:57+5:30

1. धावण्यानं हाडे होतात बळकट : तुमचे बाळ दोन वर्षांचे झाले की त्याला/तिला खेळ्यांच्या माध्यमातून व्यायाम करण्याची सवय लावावी. अॅरोबिक्स, धावणे, फुटबॉल यांसारख्या खेळाच्या प्रकारांमध्ये त्याला/तिला सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि हाडेदेखील मजबूत होतात.

2. डोळ्यांच्या व्यायामासाठी चेंडूसोबत खेळा : आपल्या मुलांसोबत खेळण्यासाठी दिवसातील काही वेळ राखून ठेवावा. चेंडू झेलण्याच्या खेळामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो. यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

3. चालावे : मुलांसोबत रोज 15 ते 30 मिनिटे नक्की व्यायाम करावा. त्यांच्यासोबत चालावे. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

4. चढाई करणे : मुलांना चढाईच्या (क्लायम्बिंग) खेळ प्रकारात सहभागी करुन घ्यावे. यामुळे हात, पाय आणि पाठीची हाडे मजबूत होतात.

5. गेम्स अॅक्टिव्हिटीदेखील आवश्यक : 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना सायकलिंग, टेनिस, स्केटिंग, स्विमिंग यांसारख्या खेळाच्या प्रकारांमध्ये सहभाग घेण्यासाठी ट्रेनिंग क्लास लावावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे.