ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमाची इच्छा होतीये? या संकेतांवरुन ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 04:07 PM2019-01-16T16:07:21+5:302019-01-16T16:22:12+5:30

ब्रेकअपनंतर कधी आणि किती दिवसांनी नव्या जोडीदारचा शोध घेतला पाहिजे? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. पण या गोष्टीला असं एका वेळेत बांधणं योग्य ठरणार नाही. कारण हे तर त्या व्यक्तीवर अवलंबून असतं की, तो कधी नव्या जोडीदारासाठी हृदयाने तयार आहे. ब्रेकअपनंतर काही दिवसांनी म्हणा किंवा काही महिन्यांनी म्हणा कुणी प्रपोज केलं जर पुन्हा रिलेशनशिपमध्ये जाणे चुकीचे ठरणार नाही. पण असं तुम्हाला कधी वाटतं किंवा त्यासाठी तुम्ही कधी तयार आहात याचे काही संकेत सांगता येतील. या गोष्टी जर तुमच्या मनात येत असतील किंवा तुम्ही तसे वागत असाल तर तुम्ही नक्कीच तयार आहात. (Image Credit :rocketparents.com)

१) आता एक्सचा राग येत नाही - जेव्हा तुम्हाला वाटेल की, आता तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा राग येणं बंद झालंय. पश्चातापाची भावना संपलीये आणि एक्सला आठवून मूड खराब होत असेल तर समजा तुम्ही त्या फेजमधून बाहेर आले आहात. आता तो भूतकाळ तुमच्यासाठी केवळ एक अनुभव आहे. तसं तुम्ही पुन्हा करणार नाही. जेणेकरुन नव्याने तयार होणारं नातं त्या गोष्टींमुळे प्रभावित होऊ नये.

२) एकटेपणाची भावना नाही - घरी राहणे, रुटीन लाइफ जगणे, कुठेच बाहेर न जाणे, पुन्हा पुन्हा फोन चेक करणे, कुणाचा फोन आलाय, मेसेज आलाय चेक करणे हे अजूनही तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही अजूनही एकटेपणाचे शिकार आहात. कारण एकटेपणातून बाहेर आलेला व्यक्ती त्याचा रिकामा वेळ चांगल्या कामात घालवतो. तो कधीही उदास राहत नाही. (Image Credit : www.stocksy.com)

३) काहीतरी नवीन घडतंय - अनेकदा लव्ह रिलेशनशिपमुळे आपण आपल्या मित्रांपासून आणि आपल्या गरजांपासून दूर जातो. पण जर तुम्ही नवीन मित्र केले, जुन्या मित्रांना भेटणं सुरु केलं, नवीन काही गोष्टी करत असाल तर तुम्ही पुढे जाण्यास तयार आहात.

४) प्रेम देण्यास तयार - ब्रेकअपनंतर जेव्हा आपण प्रेमाला मिस करतो तेव्हा एक नातं असावं अशी मनात भावना निर्माण होते. मग जर तुम्ही कुणाला प्रेम देण्यासाठी तयार असाल तर तुम्ही नव्या साथीदाराचा शोध केला पाहिजे.

५) दुसऱ्यांना पाहून दु:खं होत नाही - ज्यांचं ब्रेकअप झालेलं असतं त्यांना दुसऱ्या कपल्सना पाहून दु:खी होतात. अनेकदा चिडचिड आणि रागही येतो. पण तुम्हाला जर त्या कपल्सना पाहून काहीच फरक पडत नाही आणि ते तुमच्यासाठी एका नॉर्मल कपलसारखे आहेत. तर समजून घ्या की, तुम्ही मानसिक रुपाने ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर आले आहात. (Image Credit : sheknows.com)

६) डेटिंगची इच्छा - पहिल्यांदा कुणाला बघणे, आकर्षण वाटणे, त्या व्यक्तीशी बोलण्याचं मन करत असेल आणि त्या व्यक्तीसोबत डेट करण्याचा विचार येत असेल. तर हा याचा संकेत आहे की, तुम्ही ब्रेकअफ फेजमधून बाहेर आले आहात. (Image Credit : www.liveabout.com)

७) नाही म्हणायला तयार - आधीच्या रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टींवर तुम्हाला तडजोड करावी लागली असेल. या गोष्टी पुढे जाऊन ब्रेकअपचं कारण का ठरल्या आणि तुम्हाला कोणत्या चुका पुन्हा करायच्या नाहीयेत. वेळेनुसार तुम्हाला हे सगळं समजून येईल. त्यानुसार तुम्हाला कळेल कुठे हो आणि कुठे नाही म्हणायचंय. (Image Credit : www.herworld.com)