पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको, कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 6:50pm

भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला चाकण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी १०० टक्के बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता
चाकण शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
एकबोटेला अटक झालीच पाहिजे, भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध असो अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी चाकणच्या तळेगाव चौकात बसकण मांडली. कोणताही अनुचित प्रकार न होता आंदोलन करण्यात आले.
बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेडकर नगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा महात्मा फुलेनगर येथून मुख्य रस्त्याने माणिक चौकाकडे गेला. त्यानंतर तळेगाव चौकात काही वेळ कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

संबंधित

संभाजी भिडेंचे समर्थक रस्त्यावर
‘कोरेगाव भीमा’चे पदडसाद : बुलडाणा शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद!
खामगावात वाहनांची तोडफोड, सौम्य लाठीचार्ज
अकोला बंद : मोर्चा, रास्तारोको व दगडफेकीच्या घटना
वाशिम जिल्हय़ात कडकडीत बंद : महामार्गावर रास्ता रोको, दगडफेकीच्या घटना

पुणे कडून आणखी

चित्तथराराक युद्ध प्रात्यक्षिकांनी फेडले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे
अन...उलगडला एफटीअायअायचा प्रवास !
बाॅम्बे सॅपर्स बॅण्डच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने
बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन
मूर्ती लहान, कीर्ती महान... 'हे' वामनवृक्ष पाहून मज्जा वाटेल!

आणखी वाचा