उचलली जीभ लावली टाळ्याला

By admin | Published: April 1, 2015 12:00 AM2015-04-01T00:00:00+5:302015-04-01T00:00:00+5:30

ज्यांची नावं दोन मतदारसंघात आहेत त्यांनी एका ठिकाणी मतदान करून दुस-या मतदारसंघात जाऊन तिथंही मतदान करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मधल्या काळात बोटाची शाई पुसायला विसरू नका असं सांगायलाही पवारसाहेब विसरले नव्हते.

देशद्रोही दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नाही त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला असे वादग्रस्त विधान सोलापूरच्या आमदार आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी केले.

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला फाशी देणे चूकच होते आणि त्याला चुकीच्या पद्धतीने फाशी दिली गेल्याचे वक्तव्य करत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला होता.

सर्व पदांवर सुंदर महिलांना निवडावे असे सांगतानाच अभिनेत्री कतरिना कैफला राष्ट्रपती करा असा आगंतुक सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी दिला होता.

बाळासाहेब ठाक-यांचे पूर्वज उत्तर भारतातून महाराष्ट्रात आल्याचा दाखला देत संजय निरुपम यांनी ठाकरे कुटुंबीयही परप्रांतीय असल्याचे तर्कदुष्ट विधान करत स्थानिक-परप्रांतीय वादात तेल ओतले.

प्रत्येक मूल हे जन्माला येताना मुस्लीम म्हणूनच जन्माला येते पण आई-वडील आणि समाज त्याचे धर्मांतर करतात असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे हैदराबाद येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

इंदिरा गांधी राजीव गांधी व संजय गांधी यांना अल्लाहने बरोबर शिक्षा दिली. त्यांच्या कामांमुळेच त्यांना मृत्यूने गाठले असे निर्बुद्ध वक्तव्य सपा नेते आझम खान यांनी केले.

परपुरुषांसोबत फिरल्याने बलात्कार होतात असे चमत्कारिक वक्तव्य करणा-या अबू आझमी यांनी बलात्कार झालेल्या महिलेलाही फाशी दिली पाहिजे असे वक्तव्य केले ज्याचा त्यांच्या सुनेने म्हणजेच अभिनेत्री आएशा टाकिया हिनेही निषेध केला.

देशातल्या बलात्काराच्या घटनांसारख्या संवेदनशील विषयावर बोलताना मुलायमसिंगांची जीभ घसरली आणि मुलांकडून तरुणपणी अशा चूका होतात असे निर्लज्ज वक्तव्य त्यांनी केले.

राहूल गांधी हे दलितांच्या घरामध्ये पिकनिक आणि हनीमूनसाठी जातात अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका रामदेव बाबांनी केली होती.

महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी उधळली होती यावरून संसदेत एकच गदारोळ झाला.

मतदानाच्या आधीचे दहा दिवस लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. याच काळात हरामाचा पैसा गरीबाच्या पदरात पडतो. म्हणून या लक्ष्मीला नाकारू नका- नितीन गडकरी.

उन्हात बसू नका काळ्या व्हाल आणि तसं झालं तर तुमची लग्नं होणार नाहीत असा वादग्रस्त सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी उपोषणाला बसलेल्या आंदोलक नर्सेसना दिला.

सोनिया गांधी या गो-या असल्यामुळे त्यांना काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते तर तिला अध्यक्ष केले नसते असे वर्णद्वेषी तसेच सोनियांवर वाईट भाषेत टीका भाजपा खासदार गिरीराज सिंह यांनी केले. याआधीही अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जिभेला हाड नसल्याचे वरचेवर दाखवून दिले असून त्याची ही एक झलक...