भारतातील महिला मुख्यमंत्री

By admin | Published: April 4, 2016 12:00 AM2016-04-04T00:00:00+5:302016-04-04T00:00:00+5:30

भारतीय जनता पक्षाच्या आनंदीबेन पटेल गुजरातच्या पहिल्या महिला विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी केंद्रात गेल्यानंतर २१ मे २०१४ रोजी त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली.

तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या २० मे २०११ पासून मुख्यमंत्रीपदावर आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या वसुंधरा राजे राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या दुस-यांदा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत.

जयललिता या तामिळनाडूच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या चौथ्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत. एआयएडीएमके पक्षाच्या त्या प्रमुख आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शीला दिक्षित यांनी ३ डिसेंबर १९९८ ते ८ डिसेंबर २०१३ पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या ५४८४ दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी ८ डिसेंबर २००३ ते २३ ऑगस्ट २००४ दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या २५९ दिवस मुख्यमंत्री होत्या.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असणा-या सुषमा स्वराज यांनी १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ असे फक्त ५१ दिवस दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी चार वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी २५५४ दिवस उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी तीनवेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या २७४६ दिवस बिहारच्या मुख्यमंत्री होत्या.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजिंदर कौर भट्टल यांनी २१ जानेवारी १९९६ ते १२ फेब्रुवारी १९९७ असे ३८८ दिवस पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

जानकी रामचंद्रन यांनी १९८८ साली ७ ते ३० जानेवारी असे केवळ २३ दिवसांसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या एआयएडीएमके पक्षाच्या सदस्य होत्या.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सईदा अन्वर तैमूर यांनी ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ आसामचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या २०६ दिवस आसामच्या मुख्यमंत्री होत्या.

शशिकला काकोडकर या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या त्या प्रमुख होत्या. १२ ऑगस्ट १९७३ ते २७ एप्रिल १९७९ अशी सहावर्ष त्या गोव्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी २०८४ दिवस गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले

नंदिनी सत्पथी या देशाच्या दुस-या मुख्यमंत्री होत्या. यांनी १९७२ ते १९७६ या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या. त्या १२७८ दिवस ओदिशाच्या मुख्यमंत्री होत्या.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी २ ऑक्टोबर १९६३ ते १३ मार्च १९६७ या काळात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या १२५८ दिवस उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनांतर त्यांच्या कन्या व पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ४ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून शपथ ची घेतली. भारतात राजकारण ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नसून अनेक राज्यांमध्ये महिलांनी आपल्या कामातून जनमान्यता मिळवली आहे. देशातील महिला मुख्यमंत्र्यांची ही ओळख...