Best of 2018: 'स्वित्झर्लंड टू अर्जेंटिना' व्हाया नेपाळ, जपान, चायना... मोदींचे 14 विदेश दौरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:58 PM2018-12-27T13:58:32+5:302018-12-27T14:34:49+5:30

यंदाच्या वर्षी 22 जानेवारीला मोदींनी पहिला विदेश दौरा केला तो स्वित्झर्लंडचा. त्यासाठी 13 कोटी 20 लाख 83 हजार रुपयांचा खर्च आला.

9 फेब्रुवारी रोजी मोदींनी दुसरा विदेश दौरा केला असून त्यावेळी पॅलेस्टाईनला भेट दिली. मोदींच्या या दौऱ्याचा विमान खर्च 9 कोटी 59 लाख 64 हजार रुपये आहे.

16 एप्रिल रोजी मोदींनी तिसरा विदेश दौरा केला. या दौऱ्यात, स्विडन, लंडन अन् जर्मनीला मोदींनी भेट दिली. या दौऱ्याचा खर्च पीएमओ साईटवर उपलब्ध नाही.

26 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले होत, या दौऱ्याचा विमानखर्च 6 कोटी 7 लाख 46 हजार एवढा झाला.

मोदींचा या वर्षातील पाचवा दौरा नेपाळ होता. 11 मे रोजी मोदींनी नेपाळला भेट दिली.

21 मे रोजी मोदींनी रशिया दौऱ्यासाठी उड्डाण केलं होतं. या दौऱ्यात त्यांनी रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली, हा दौरा चर्चेचा विषय बनला होता.

मोदींनी 29 मे रोजी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यासाठी देश सोडला. 29 मे ते 2 जून असा हा 4 दिवसांचा सातवा दौरा मोदींनी केला.

9 जून रोजी मोदींनी पुन्हा चीन दौरा केला. 9 आणि 10 जून रोजी मोदींचा हा दौरा होता. शी जीनपींग यांच्याशी त्यांची भेट चर्चेचा विषय ठरला.

जुलै महिन्यात मोदींनी आफ्रिकन देशांना भेटी दिल्या, त्यामध्ये युगांडा, रवांडा आणि दक्षिण आफ्रिेकेतील राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी चर्चा केली.

ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले होते. मोदींचा हा दौराही चर्चेचा विषय बनला होता, या दौऱ्यात मोदींनी हिंदू मंदिरांना भेटी दिल्या.

27 ऑक्टोबर रोजी मोदी जपान दौऱ्यावर होते, बुलेट ट्रेनमुळे मोदींचा जपान दौरा अधिक गाजला. या दौऱ्यात मोदींनी जपानच्या शिंजो आबे यांची भेट घेतली.

13 नोव्हेबर रोजी मोदी सिंगापूर दौऱ्यावर होते, 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मोदींनी सिंगापूरला भेट दिला. यंदाच्या वर्षातला मोदींचा हा बारावा दौरा होता.

नोव्हेंबर 17 रोजी पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर होते, यावेळी मोदींनी मोहम्मद सोलीह यांना निवडणुकांमधील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

यंदाच्या वर्षीतील मोदींचा अखेरचा दौरा अर्जेंटीना ठरला. 28 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर असा हा दौरा होता. त्यानंतर, मोदी अद्याप परदेश दौऱ्यावर गेले नाहीत. मोदींचे यंदाच्या वर्षात एकूण 14 विदेश दौरे झाले आहेत.