आशियाई सुवर्णकन्या विनेश फोगटच्या लग्नाचा थाटमाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:25 PM2018-12-18T14:25:06+5:302018-12-18T14:37:46+5:30

आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटने नुकतेच प्रियकर सोमवीर राठी याच्याशी विवाह केले. तिच्या लग्नाच्या रिसेप्शनचा थाटमाट एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नव्हता. जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत विनेश आणि भालाफेकपटू निरज चोप्रा यांच्या प्रेमाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, विनेशने त्यावर नाराजी प्रकट केली आणि मायदेशात परतताच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली. साखरपुड्याच्या या वृत्ताला दुजोरा देताना विनेशने लवकरच विवाह करणार असल्याचे सांगितले होते.