WWF स्टार जॉनी वालियंतचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:48 PM2018-04-06T17:48:43+5:302018-04-06T17:48:43+5:30

न्युयॉर्क : WWF स्टार जॉनी वालियंत यांचा ट्रकच्या अपघात मृत्यू झाला. ते 71 वर्षांचे होते. जॉनी वालियंत यांचे मूळनाव थॉमल सलिवन होते.

पेंसिल्वेनियामध्ये एका ट्रकने त्यांच्या गाडीला गुरुवारी धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

जॉनी वालियंत यांनी WWF मध्ये अनेक वर्षे सामने खेळले होते. 70 च्या दशकात जॉनी यांनी जिमी वालियंतसोबत त्यांनी WWF मध्ये खेळायला सुरुवात केली.

या दोघांनी त्यावेळी अनेक मेडल्स मिळविले.तसेच, WWF च्या चाहत्यांमध्ये ते दोघे 'वालियंत ब्रदर्स' म्हणून फेमस होते.

त्याशिवाय, टेलिव्हिजन शो आणि सिनेमांमध्ये सुद्धा या दोघांनी काम केले आहे.